Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - भारतीय संघाने वन डे क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्ध ( धावांनी) सर्वात मोठा विजय आज मिळवला. विजयासाठी ठेवलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला १२८ धावा करता आल्या अन् भारताने २२८ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी २००८ मध्ये मिरपूर येथे १४० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) पाच विकेट्स घेतल्या आणि आशिया चषकात ५ विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अर्शद आयूब ( वि. पाकिस्तान, १९८८) यांनी हा पराक्रम केला होता. आजच्या विजयासह भारताने Super 4s Point Table मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आणि पाकिस्तानची घसरण झाली.
पाकिस्तानच्या ८ विकेट्स पडल्या, पण मग All Out कसे झाले? absent hurt ने सारेच चक्रावले
रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी काल १२१ धावांची भागीदारीनंतर आज विराट कोहली ( १२२*) आणि लोकेश राहुल ( १११*) यांनी शतकं झळकावून भारताला २ बाद ३५६ धावा उभ्या करून दिल्या. दोघांनी तिसऱ्या विकेट्ससाठी २२३ धावांची विक्रमी भागीदारी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानला जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. त्यानंतर कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) कमाल केली आणि २५ धावा देत ५ फलंदाजांना माघारी पाठवले. फखर जमान ( २७), सलमान आघा ( २३), शादाब खान ( ६), इफ्तिखार अहमद ( २३) आणि फहीम अश्रफ ( ४) यांच्या विकेट्स कुलदीपने काढल्या. ८ बाद १२८ धावांवर पाकिस्तानने हार मानली. पाकिस्तानचे गोलंदाज हॅरीस रौफ व नसीम शाह जखमी असल्याने फलंदाजीला नाही आले आणि भारताने २२८ धावांनी मॅच जिंकली.
भारताने २२८ धावांनी विजय मिळवून सुपर ४ गटात अव्वल स्थानी झेप घेतली आणि ४.५६० असा भारताचा नेट रन रेट आहे. आता त्यांना श्रीलंका ( उद्या) आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचा सामना जिंकून फायनल सहज गाठता येईल. श्रीलंका ०.४२ नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांचा भारत व पाकिस्तान यांचा सामना करायचा आहे. तर पाकिस्तानचा एकच सामना शिल्लक आहे आणि त्यांना तो कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.
Web Title: Asia Cup 2023 India vs Pakistan Live - India are the Table Toppers of Super 4s with NRR is 4.560, Pakistan Slip To Third
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.