Join us  

पाकिस्तानच्या ८ विकेट्स पडल्या, पण मग All Out कसे झाले? absent hurt ने सारेच चक्रावले

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक शतकानंतर कुलदीप यादवच्या फिरकीने कमाल करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:13 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Pakistan Live Asia Cup 2023 - विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या वैयक्तिक शतकानंतर कुलदीप यादवच्या फिरकीने कमाल करून दाखवली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३५७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे ८ फलंदाज १२८ धावांवर तंबूत परतले. ३२ षटकांत हा सामना संपला, परंतु ८ विकेट्स गेल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन केल्याने सारेच चक्रावले. धावफलकावर absent hurt चा मार्क देऊन पाकिस्तानला All Out जाहीर केले गेले. 

OUCH! पाकिस्तानी फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला, कुलदीप यादवच्या फिरकीने करिष्मा केला

रोहित शर्मा ( ७६) व शुबमन गिल ( ५८) यांनी काल १२१ धावांची भागीदारीनंतर आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा पाऊस पाडला. पाकिस्तानविरुद्ध भारताने २ बाद ३५६ धावा चोपल्या.  विराट कोहलीने ९४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२२ धावा केल्या आणि लोकेश राहुल १०६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. त्यानंतर कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) कमाल केली आणि २५ धावा देत ५ फलंदाजांना माघारी पाठवले.  फखर जमान ( २७), सलमान आघा ( २३), शादाब खान ( ६), इफ्तिखार अहमद ( २३) आणि फहीम अश्रफ ( ४) यांच्या विकेट्स कुलदीपने काढल्या.  ८ बाद १२८ धावांवर पाकिस्तानने हार मानली.

नेमके काय घडले? पाकिस्तानचे गोलंदाज हॅरीस रौफ व नसीम शाह जखमी असल्याने फलंदाजीला नाही आले आणि भारताने २२८ धावांनी मॅच जिंकली. हॅरीसला कालच दुखापत झाल्याने त्याने आज ५ षटकं फेकली नाहीत, तर नसीमलाही आज दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानने या दोन प्रमुख गोलंदाजांबाबत कोणताच धोका पत्करण्याचा निर्णय घेतलेला असल्याने त्यांना absent hurt म्हणून जाहीर केले गेले. त्यामुळे ८ विकेट्स पडल्यानंतर पाकिस्तान ऑल आऊट झाला. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानकुलदीप यादवविराट कोहलीलोकेश राहुल