Join us  

मोहम्मद सिराजची मन जिंकणारी कृती! ग्राऊंड्समन्सना प्लेअर ऑफ दी मॅचच्या पुरस्काराची रक्कम 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : आशिया चषक २०२३ ची फायनल लक्षात राहिल ती मोहम्मद सिराज याच्या अप्रतिम स्पेलने...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 7:13 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : आशिया चषक २०२३ ची फायनल लक्षात राहिल ती मोहम्मद सिराज याच्या अप्रतिम स्पेलने... सिराजने ७-१-२१-६ अशी स्पेल टाकून आजचा सामना गाजवला. श्रीलंकेविरुद्धही ही वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने पाकिस्तानच्या वकार युनिसचा १९९० मध्ये शारजा येथे नोंदवलेला ( ६-२६) विक्रम मोडला. ६ विकेट्स घेणाऱ्या सिराजला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला अन् त्याने या बक्षीस रकमेची रक्कम ग्राऊंड्समन्सना दिली. श्रीलंकेतील सामन्यात पावसाने सातत्याने व्यत्यय आणला, परंतु ग्राऊंड्समन्सच्या मेहनतीने सामने खेळवता आले. सिराजला मॅन ऑफ दी मॅच म्हणून ३००० डॉलर मिळाले आणि ते त्याने ग्राऊंड्समन्सना दिले. भारतीय किमतीत ही रक्कम अडीच लाख इतकी होते.

जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली.  भारताने १५.२ षटकांत श्रीलंकेला ५० धावांवर ऑल आउट केले आणि १० विकेट्स व २६३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.  माफक लक्ष्याचा पाठलाग करायला इशान किशन व शुबमन गिल ही युवा जोडी मैदानावर आली. या दोघांनी दमदार फटकेबाजी करून ६.१ षटकांत मॅच संपवली. इशान १७ चेंडूंत २२ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. 

ACCने दिले ४२ लाख...आशिया चषकात खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. असे असताना देखील पाऊस थांबताच मैदान खेळण्यासाठी सज्ज व्हावे यासाठी श्रीलंकेच्या ग्राउंड स्टाफ आणि क्युरेटर्स यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद आणि श्रीलंका क्रिकेटने त्यांना बक्षीसाची घोषणा केली आहे. यामध्ये कॅंडी आणि कोलंबोच्या मैदानी कर्मचाऱ्यांना ५० हजार यूएस डॉलर एवढी रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ४२ लाख रूपये दिले जाणार आहेत. याबाबत जय शहा यांनी एक पोस्ट करून माहिती दिली आहे.  

 

टॅग्स :एशिया कप 2023मोहम्मद सिराजभारत विरुद्ध श्रीलंका