Join us  

World Record : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारत- श्रीलंका अंतिम सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:48 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारत- श्रीलंका अंतिम सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. महीशा तीक्षणाला आजच्या सामन्यात मुकावे लागले आहे, तर भारताकडून अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनबाहेर गेला आहे. वॉशिंग्टन सुंदरला थेट एन्ट्री मिळाली आहे. टॉस झाल्यानंतर खेळाडू राष्ट्रगीताला येणार, तितक्यात जोरदार पाऊस पडला. ३.३० वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात आली आणि ३.४० वाजता सामना सुरू झाला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला भोपळ्यावर माघारी पाठवले. 

 मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. त्याने चौथ्या षटकात ४ विकेट्स घेतल्या. पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा हे फॉर्मात असलेले फलंदाज माघारी परतल्याने श्रीलंकनच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. वन डे क्रिकेटमध्ये एकाच षटकात ४ विकेट्स घेणारा सिराज हा पहिलाच भारतीय ठरला. त्यानंतर त्याने कर्णधार दासून शनाकाचा त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था ६ बाद १२ धावा अशी केविलवाणी केली. १०व्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर कुसल मेंडिसला स्लीपमध्ये झेल टाकला. पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटला वाटलं लोकेश राहुल झेल घेईल अन् लोकेशला वाटलं विराट... या गडबडीत झेल कुणीच घेतला नाही.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येत ६ विकेट्स गेल्याची ही तिसरी निचांक कामगिरी ठरली. कॅनडाचा संघ २०१३ मध्ये नेट किंग सिटीविरुद्ध ६-१०असा, कॅनडाचाच संघ २००३मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६-१२ असा गडगडला होता. कर्णधार रोहित शर्माने सिराजला गोलंदाजीला कायम ठेवले अन् त्याने १२व्या षटकात कुसल मेंडिसचा ( १७) त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था ७ बाद ३३ अशी केली. २००२ नंतर वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या १० षटकांत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम सिराजने नावावर केला. २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या. 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकामोहम्मद सिराज