Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतीय संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया चषक उंचावला... मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ १५.१ षटकांत ५० धावांत गडगडला. सिराजने ७-१-२१-६ अशी स्पेल टाकून हा सामना गाजवला. इशान किशन आणि शुबमन गिल या युवा जोडीने ६.१ षटकांत भारताला १० विकेट्स राखून विजय पक्का केला. मोहम्मद सिराजल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर कुलदीप यादव प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ठरला. सिराजने त्याला मिळालेली बक्षीस रक्कम ग्राऊंड्समन्सना दिली. त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही खेळू शकलो, असे तो म्हणाला.
या विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्ष जय शाह यांनी कर्णधार रोहित शर्माकडे ट्रॉफी दिली. रोहितने परंपरा कायम राखताना ती संघातील दुसऱ्या खेळाडूकडे दिली, पण तो दुसरा खेळाडू मोहम्मद सिराज नव्हता... रोहितने ट्रॉफी युवा खेळाडू तिलक वर्मा व इशान किशन यांच्याकडे सोपवली. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.