दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील सामन्यात भारताला २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने रडकुंडीला आणले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 05:47 PM2023-09-12T17:47:48+5:302023-09-12T17:48:33+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Dunith Wellalage picks up five-wicket haul, Youngest Sri Lankan bowler to a five-for in ODIs, India 172/6   | दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील सामन्यात भारताला २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने रडकुंडीला आणले. पाकिस्तानविरुद्ध विक्रमी विजय मिळवल्यानंतर १५ तासांच्या आत पुन्हा मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर हार मानावी लागली. फिरकीसाठी पोषक खेळपट्टी पाहूनच रोहितनेही अक्षर पटेलला संधी दिली. पण, प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताचे ६ फलंदाज माघारी परतले आहेत आणि यापैकी ५ विकेट्स वेलालागेने घेतल्या आहेत आणि एका विकेटमध्ये त्याने झेल घेऊन योगदान दिलेय.

Video : २० वर्षीय खेळाडूने रोहित, विराट, शुबमनला गंडवले; चेंडू असे वळवले की दोघांचे दांडे अन्...


भारताला चांगल्या सुरुवातीनंतर ३ धक्के बसले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली, परंतु २० वर्षीय गोलंदाज  दुनित वेलालागेने ( Dunith Wellallage) श्रीलंकेला यश मिळवून दिले. त्याने शुबमन ( १९), विराट कोहली ( ३) आणि रोहित शर्मा ( ५३) यांना अप्रतिम चेंडूवर गंडवले. १२व्या षटकात श्रीलंकेने २० वर्षीय गोलंदाज वेलालागेला आणले अन् त्याच्या पहिल्या षटकात शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला, दुसऱ्या षटकात विराटला ( ३) झेलबाद केले अन् तिसऱ्या षटकात रोहितला ( ५३) त्रिफळाचीत केले. २००० नंतर तीनवेळाच डावखुऱ्या फिरकीपटूला भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले आहे. यापूर्वी अॅश्ली जाएल्सने २००२ मध्ये सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग व दिनेश मोंगिया यांना, तर २०११ मध्ये पीटर सीलार ( नेदरलँड्स) याने सेहवाग, सचिन व युसूफ पठाणला बाद केले होते. 


लोकेश राहुल व इशान किशन यांनी भारताचा डाव हळुहळू सावरला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याचा दोघांनी संयमाने सामना केला. पण, लोकेशचा संयम वेलालागेन तोडला. इशानसह ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करणारा लोकेश ( ३९) कॉट अँड बोल्ड झाला. वेलालागेने चौथा धक्का दिला. इशानच्या खेळीचे आज कौतुक करावे तितके कमी... श्रीलंकेच्या फिरकीचा त्याने चांगला सामना केला अन् खराब चेंडू मिळताच उत्तुंग फटके खेचले. पण, पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंकाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ३३ ( ६१ चेंडू) धावांवर वेलालागेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. वेलालागेने त्याच्या १० षटकांत १ निर्धाव षटक टाकून ४० धावांत ५ विकेट्स घेतल्या. भारताचे सहा फलंदाज १७२ धावांवर तंबूत परतले.  श्रीलंकेकडून वन डेत ५ विकेट्स घेणारा वेलालागे हा युवा गोलंदाज ठरला. त्याने २० वर्ष व २४६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला. यापूर्वी २००१ मध्ये बुद्धीका फर्नांडोने २१ वर्ष व ६५ दिवसांचा असताना झिम्बाब्वेविरुद्ध हा पराक्रम केला होता. 

Web Title: Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Dunith Wellalage picks up five-wicket haul, Youngest Sri Lankan bowler to a five-for in ODIs, India 172/6  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.