पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागे ( Dunith Wellallage) याने आजचा दिवस संस्मरणीय बनवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:25 PM2023-09-12T18:25:23+5:302023-09-12T18:25:36+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Five wicket haul for Dunith Wellalage ( 5-40), Charith Asalanka aslo take 4 wickets, Rain stop play, India 197/9 | पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स 

पाऊस आला! २० वर्षांचा पोरगा टीम इंडियावर भारी पडला, स्पिनर्संनी घेतल्या ९ विकेट्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागे ( Dunith Wellallage) याने आजचा दिवस संस्मरणीय बनवला. रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या सारखे दिग्गजांसह शुबमन गिल या भविष्याचा स्टार मानल्या जाणाऱ्या खेळाडूला वेलालागेने फिरकीच्या जाळ्यात ओढले. त्याने १० षटकांत ४० धावांत ५ विकेट्स घेत श्रीलंकेकडून मोठा विक्रम नोंदवला. पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंकाची साथ मिळाली.  

 दुनिथ वेलालागेने २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; भारताच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला


रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिल्यानंतर  वेलालागेने ( Dunith Wellallage) वर्चस्व गाजवले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात शुबमनचा ( १९) त्रिफळा उडवला, दुसऱ्या षटकात विराटला ( ३) झेलबाद केले अन् तिसऱ्या षटकात रोहितला ( ५३) त्रिफळाचीत केले. लोकेश राहुल व इशान किशन यांनी भारताचा डाव सावरला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्याचा दोघांनी संयमाने सामना केला. पण, लोकेशचा संयम वेलालागेन तोडला. इशानसह ८९ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करणारा लोकेश ( ३९) कॉट अँड बोल्ड झाला. 


इशानच्या खेळीचे आज कौतुक करावे तितके कमी... श्रीलंकेच्या फिरकीचा त्याने चांगला सामना केला अन् खराब चेंडू मिळताच उत्तुंग फटके खेचले. पण, पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंकाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ३३ ( ६१ चेंडू) धावांवर वेलालागेच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथच्या अप्रतिम चेंडूवर रवींद्र जडेजा ( ४) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. चरिथने ४३व्या षटकात जसप्रीत बुमराहचा ( ५) त्रिफळा उडवला. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवही गोल्डन डकवर परतला. पण, त्याची हॅटट्रीक हुकली. पावसामुळे खेळ थांबला. भारताने ४७ षटकांत ९ बाद १९७ धावा केल्या आहेत. 

Web Title: Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Five wicket haul for Dunith Wellalage ( 5-40), Charith Asalanka aslo take 4 wickets, Rain stop play, India 197/9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.