भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारताचा संपूर्ण संघ २१३ धावांवर माघारी पाठवणाऱ्या यजमान श्रीलंकेची सुरुवात काही खास झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:01 PM2023-09-12T20:01:51+5:302023-09-12T20:02:14+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Heart in mouth moment as Jasprit Bumrah lands awkwardly in his follow-through and nearly twists his ankle. Looked scary but he seems to be okay  | भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही

भारतीय खेळाडूंचा चुकला होता काळजाचा ठोका; जसप्रीत बुमराहसोबत घडलं असं काही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : भारताचा संपूर्ण संघ २१३ धावांवर माघारी पाठवणाऱ्या यजमान श्रीलंकेची सुरुवात काही खास झाली नाही. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) त्याच्या दुसऱ्या षटकात श्रीलंकेचा ओपनर पथून निसंकाला माघारी पाठवले. पण, पहिल्या षटकात भारतीय खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला होता, कारण बुमराहसोबत असं काहीतरी घडलं होतं... बुमराह दुखापतीतून सावरत नुकताच भारतीय संघात परतला आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. याआधी बुमराहला दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. आज पहिल्याच षटकात सर्वांचं टेंशन वाढवणारा प्रसंग घडला.


२० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेल्लालागे (5-40) आणि पार्ट टाईम गोलंदाज चरिथ असालंका ( 4-18) यांच्या फिरकीची जादू आज चालली. वेल्लालागेने रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांची विकेट मिळवली.  अक्षर पटेलने १०व्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत उपयुक्त २७ धावा जोडल्याने भारताने दोनशेचा पल्ला पार केला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर रोहित शर्मा ( ५३) व शुबमन गिल ( १९) यांनी ८० धावांची सलामी दिली. पण, वेल्लालागेने झटपट ५ विकेट्स घेतल्या. लोकेश राहुल ( ३९) व इशान किशन ( ३३) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी आज कमाल केली. 


अक्षर पटेलने २६ धावा केल्या. भारताचा संपूर्ण संघ ४९.१ षटकांत २१३ धावांवर तंबूत परतला. प्रथमच भारताचे १० फलंदाज स्पिनर्सने बाद केले. महिषा थीक्षाणाने शेवटची विकेट घेतली, वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे १० फलंदाज फिरकीपटूंनी माघारी पाठवले. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या जसप्रीतने श्रीलंकेला धक्का दिला. सलामीवीर पथूम निसंका ६ धावांवर बाद झाला आणि लोकेश राहुलने यष्टिंमागे अफलातून झेल टिपला. पण, त्याआधीच्या षटकात ओल्या खेळपट्टीवर जसप्रीतचा पाय मुरगळला होता. हा प्रसंग पाहून विराट, रोहित, लोकेश सर्वांचं काही क्षणापूरते टेंशन वाढले होते. पण, जसप्रीत पूर्णपणे बरा असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

Web Title: Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Marathi : Heart in mouth moment as Jasprit Bumrah lands awkwardly in his follow-through and nearly twists his ankle. Looked scary but he seems to be okay 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.