VIDEO : आशिया कपपूर्वी विराट-रोहितसमोर चाहत्यांची 'फिल्डिंग', जबरा फॅनचं 'विराट' अभिनंदन

Rohit Sharma on Asia Cup 2023 :  भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आशिया चषकाची मोठी स्पर्धा खेळणार आहे. 

By ओमकार संकपाळ | Published: August 24, 2023 03:06 PM2023-08-24T15:06:43+5:302023-08-24T15:07:05+5:30

whatsapp join usJoin us
 Asia Cup 2023 Indian captain Rohit Sharma and Virat Kohli spotted at the airport, watch the video  | VIDEO : आशिया कपपूर्वी विराट-रोहितसमोर चाहत्यांची 'फिल्डिंग', जबरा फॅनचं 'विराट' अभिनंदन

VIDEO : आशिया कपपूर्वी विराट-रोहितसमोर चाहत्यांची 'फिल्डिंग', जबरा फॅनचं 'विराट' अभिनंदन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आशिया चषकाची मोठी स्पर्धा खेळणार आहे. ३० ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होत असून सलामीचा सामना पाकिस्तानातील मुल्तान येथे यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. तर, कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे २ सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असून आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. 

श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय स्टार विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी कर्णधार रोहित शर्माने आशिया चषक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. तर, विराट कोहलीच्या जबरा फॅनला आपल्या आवडत्या खेळाडूसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. चाहत्याचं हे प्रेम पाहून कोहलीनं देखील त्याचं 'विराट' अभिनंदन करताना 'क्या बात है' असं म्हटलं.

३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे, तर १७ सप्टेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेनंतर ५ ऑक्टोबरपासून भारतात बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होईल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकात २ सप्टेंबर तर विश्वचषकात १४ ऑक्टोबरला आमनेसामने असतील. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,  

 राखीव खेळाडू - संजू सॅमसन 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल 

Web Title:  Asia Cup 2023 Indian captain Rohit Sharma and Virat Kohli spotted at the airport, watch the video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.