भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का?

Asia Cup 2023 - यंदाच्या वर्षात भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी किमान ३-४ वेळा समोरासमोर येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:22 PM2023-08-17T16:22:51+5:302023-08-17T16:23:40+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 match between India vs Pakistan Tickets Prices revealed, starting from Rs 2500 | भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का?

भारत-पाकिस्तान लढतीच्या तिकिटांच्या किमती ठरल्या; बघा खिशाला परवडतात का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 - यंदाच्या वर्षात भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी किमान ३-४ वेळा समोरासमोर येणार आहेत. त्याची सुरूवात २ सप्टेंबरला कँडी येथील आशिया चषक स्पर्धेच्या लढतीतून होईल. आशिया चषक स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होतेय आणि त्यात IND vs PAK हा हायव्होल्टेज सामना २ सप्टेंबरला होणार आहे आणि त्या सामन्याच्यात तिकिटांच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI ने संघाला पाकिस्तानला पाठवणार नसल्याची भूमिका घेतल्याने भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला.


आशिया चषक स्पर्धेतील १३ पैकी ४ सामने पाकिस्तानात होणार आहेत आणि त्यानंतर फायनलसह सर्व सामने श्रीलंकेत होतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने  ( SLC) त्यांच्या देशात होणाऱ्या IND vs PAK सामन्यांच्या तिकिटाचे दर जाहीर केले आणि २५०० रुपयांपासून हे तिकिट चाहत्यांना घेता येणार आहे.  २ सप्टेंबरपासून श्रीलंकेत ९ सामने खेळवण्यात येणार आहेत. ३५ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या कँडी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. २५०० हे २५००० पर्यंत भारत-पाकिस्तान लढतीचे तिकिट विकले जात आहे. 
  
आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल 

Web Title: Asia Cup 2023 match between India vs Pakistan Tickets Prices revealed, starting from Rs 2500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.