Asia Cup 2023 - यंदाच्या वर्षात भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी किमान ३-४ वेळा समोरासमोर येणार आहेत. त्याची सुरूवात २ सप्टेंबरला कँडी येथील आशिया चषक स्पर्धेच्या लढतीतून होईल. आशिया चषक स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होतेय आणि त्यात IND vs PAK हा हायव्होल्टेज सामना २ सप्टेंबरला होणार आहे आणि त्या सामन्याच्यात तिकिटांच्या विक्रीला सुरूवात झाली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी BCCI ने संघाला पाकिस्तानला पाठवणार नसल्याची भूमिका घेतल्याने भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आशिया चषक स्पर्धेतील १३ पैकी ४ सामने पाकिस्तानात होणार आहेत आणि त्यानंतर फायनलसह सर्व सामने श्रीलंकेत होतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ( SLC) त्यांच्या देशात होणाऱ्या IND vs PAK सामन्यांच्या तिकिटाचे दर जाहीर केले आणि २५०० रुपयांपासून हे तिकिट चाहत्यांना घेता येणार आहे. २ सप्टेंबरपासून श्रीलंकेत ९ सामने खेळवण्यात येणार आहेत. ३५ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या कँडी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. २५०० हे २५००० पर्यंत भारत-पाकिस्तान लढतीचे तिकिट विकले जात आहे. आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल