नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

लोकेश राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 05:32 PM2023-09-03T17:32:00+5:302023-09-03T17:32:36+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 : 'Name more important or form?': Gautam Gambhir and Mohammad Kaif got involved in a heated exchange on live TV | नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् पाकिस्तानने ४८.५ षटकांत भारताचा संपूर्ण संघ २६६ धावांत माघारी पाठवला. त्यानंतर पावसाने दमदार फटकेबाजी केली अन् मॅच रद्द करावी लागली. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) अनुपस्थितीत इशान किशनला या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने ८१ चेंडूंत ८२ धावांची खेळी करून पाकिस्तानची हालत खराब केली. हार्दिक पांड्यासोबत ( ८७) त्याने १३८ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, आता राहुल पूर्णपणे फिट झालाय अन् तो आशिया चषकासाठी श्रीलंकेत दाखल होणार आहे.


राहुल येताच प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान पक्के होईल आणि इशानला बाहेर बसावे लागेल. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही राहुलच पहिली पसंती आहे. राहुलच्या निवडीवरून गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ या माजी खेळाडूंमध्ये लाईव्ह शो दरम्यान शाब्दिक वाद झाला. इशानला बॅक अप यष्टिरक्षक म्हणून नेहमी निवडले जाते. त्याने वन डे क्रिकेटमध्ये जलद द्विशतक झळकावले आहे आणि त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून दाखवलं आहे. तरीही राहुलचे पुनरागमन होताच त्याला राखीव म्हणूनच पाहिले जाईल. पाकिस्तानविरुद्धही ४ बाद ६६ धावा अशा दयनीय अवस्थेत भारतीय संघ असताना इशान मैदानावर आला अन् ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

Image


या सामन्यानंतर कैफने एक मुद्दा छेडला. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर भारतीय संघाने काय करायला हवं, असे कैफने विचारले. त्याने ८२ धावा करणाऱ्या इशानच्या जागी थेट राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी, असे मत मांडले. कारण, राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता, खराब फॉर्मामुळे नाही. तो म्हणाला,''लोकेश राहुलने स्वतःला मॅच विनर म्हणून सिद्ध केले आहे. पाचव्या क्रमांकावर त्याने दमदार कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच राहुल द्रविडच्या डोक्यात त्याच्याबद्दल स्पष्टता आहे. KL फिट झाला, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायला हवे अन् इशानला पुढच्या संधीची वाट पाहायला हवी. इशानने चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत, परंतु तो आता राहुलला रिप्लेस करू शकत नाही.''

गौतम गंभीरचे स्पष्ट मत
पण, गंभीरने कैफच्या मतावर सहमती दर्शवली नाही. त्याने एकच प्रश्न विचारला आणि तो म्हणजे, वर्ल्ड कप जिंकण्यासाठी नाव महत्त्वाचे आहे की फॉर्म? यावर कैफला काय उत्तर द्यावे हेच समजले नाही. गंभीर पुढे म्हणाला, कोहली किंवा रोहित यांनी सलग चार अर्धशतकं झळकावली असती, तर KL Rahul साठी आता जे तू म्हणत आहेत, ते तेव्हाही म्हटले असतेस का? तुम्ही जेव्हा वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी करता तेव्हा नावाकडे पाहत नाही, तर खेळाडूचा फॉर्म पाहता. जो तुम्हाला ट्रॉफी जिंकून देऊ शकतो. ''

कैफने यावर मध्येच त्याचे मत मांडले, तो म्हणाला मग भारताला आणखी प्रतिक्षी पाहावी लागेल. त्यावर गंभीरने इशान का वर्ल्ड कप संघात हवा हे समजावून सांगितले. तो म्हणाला, इशानने संघातील स्थान टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. राहुलप्रमाणे तो जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही, म्हणून आपण वाद घालतोय. अनेक असे खेळाडू आहेत की ज्यांना दुखापतीमुळे संघातील स्थान गमवावे लागले आहे आणि त्यांच्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. त्यापैकी काहींना पुढची संधी मिळण्याची प्रतीक्षा पाहावी लागली, तर काहींना दुसरी संधी मिळाली नाही. हे सत्य आहे. राहुलने पाचव्या क्रमांकाला योग्य न्याय दिला आहे, परंतु इशानने सातत्य दाखवलेय. या दोघांची तुलना होऊ शकत नाही.''  

Web Title: Asia Cup 2023 : 'Name more important or form?': Gautam Gambhir and Mohammad Kaif got involved in a heated exchange on live TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.