विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सामन्यावर पकड घेतलीय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:29 PM2023-09-06T20:29:04+5:302023-09-06T20:29:33+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 PAK vs BAN Live : Babar Azam becomes the fastest captain to score 2000 ODI runs. He's broken Virat Kohli's record, but Azam is cleaned up by Taskin Ahmed | विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सामन्यावर पकड घेतलीय. बांगलादेशचा संपूर्ण संघ १९३ धावांवर तंबूत पाठवल्यानंतर यजमानांच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने भारताचा स्टार विराट कोहली ( Virat Kohli) याचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. विराटचा विक्रम मोडल्याने पाकिस्तानी फॅन्सना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या, परंतु बांगलादेशचा गोलंदाज तस्कीन अहमदने पाकिस्तानी कर्णधाराचा दांडा उडवला अन् स्टेडियम शांत झाले. 



बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन ( ५४) आणि मुश्फिकर रहिम ( ६५) यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह विक्रमी शतकी भागीदारी करून डाव सावरला होता. पण, शाकिबची विकेट पडली अन् पुढील ४६ धावांत ६ फलंदाज माघारी परतले. पहिल्या १० षटकांत त्यांचे मोहम्मद नईम ( २०), मेहिदी हसन मिराझ ( ०), लिटन दास ( १६) आणि तोवहिद हृदय ( २) हे चार फलंदाज माघारी परतले. शाकिबने  ५७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या आणि रहिमने ८७ चेंडूंत ६४ धावा केल्या. बांगलादेशचा डाव ३८.४ षटकांत १९३ धावांवर गडगडला.हॅरिस रौफने ४, नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या. 


फखर जमानला जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही. ५ षटकानंतर स्टेडीयममधील एक फ्लड लाईट बंद झाली होती आणि ३० मिनिटानंतर ती दुरुस्त झाली. त्यानंतर शोरिफूल इस्लामने पाकिस्तानला पहिला धक्का देताना फखरला ( २०) बाद केले. त्यानंतर कर्णधार बाबर आजम व इमाम-उल-हक यांनी चांगला खेळ केला. वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा करण्याचा विक्रम बाबरने नावावर केला. त्याने विराट कोहली ( ३६ इनिंग्ज) याचा विक्रम मोडला. पण, तस्कीनने त्याची विकेट घेतली. बाबरचा १७ धावांवर त्रिफळा उडाला.  

Image

Web Title: Asia Cup 2023 PAK vs BAN Live : Babar Azam becomes the fastest captain to score 2000 ODI runs. He's broken Virat Kohli's record, but Azam is cleaned up by Taskin Ahmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.