Join us  

पाकिस्तानची 'बत्ती'गूल झाली अन् आशिया चषक यजमानांची फजिती उडाली

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : श्रीलंकेतील पावसामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळवायला हवी होती, असा यांचा दावा होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 7:13 PM

Open in App

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : श्रीलंकेतील पावसामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळवायला हवी होती, असा दावा माजी खेळाडू करताना दिसत आहेत. भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला होता. त्यात १० सप्टेंबरच्या IND vs PAK लढतीवर पावसाचं सावट आहेत. १५ वर्षांनंतर पाकिस्तानत आशिया चषक परतला आहे, परंतु केवळ ४ सामने इथे होत आहेत. पण, आज सुपर ४ च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध असा प्रसंग घडला की पाकिस्तानात संपूर्ण आशिया चषक खेळवण्याच्या दावा करणारे तोंडावर आपटले. 

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांचा दबदबा राहिला. बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन ( ५४) आणि मुश्फिकर रहिम ( ६५) यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह विक्रमी शतकी भागीदारी करून डाव सावरला होता. पण, दोघांपैकी एकाची विकेट पडली अन् पुढील ४६ धावांत ६ फलंदाज माघारी परतले. पहिल्या १० षटकांत त्यांचे मोहम्मद नईम ( २०), मेहिदी हसन मिराझ ( ०), लिटन दास ( १६) आणि तोवहिद हृदय ( २) हे चार फलंदाज माघारी परतले. शाकिब आणि रहिम यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला. पण, शाकिब  ५७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांवर झेलबाद झाला अन् पुढील ४६ धावांत संपूर्ण संघ तंबूत परतला. बांगलादेशचा डाव ३८.४ षटकांत १९३ धावांवर गडगडला. रहिमने ८७ चेंडूंत ६४ धावा केल्या. हॅरिस रौफने ४, नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तारात चौथ्या षटकात फखर जमाचा झेल स्लीपमध्ये टाकला. फखर १३ आणि इमाम उल हक २ धावांवर खेळत असताना स्टेडियमवरील लाईट्स गेल्या अन् ५ षटकानंतर बराच काळ सामना थांबवावा लागला आहे.

टॅग्स :एशिया कप 2023पाकिस्तानबांगलादेश
Open in App