Join us  

पाकिस्तानने Super 4 चा पहिला सामना जिंकला; बांगलादेशला नमवून तालिकेत फेरबदल घडवला 

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 9:52 PM

Open in App

Asia Cup 2023 PAK vs BAN Live : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवला. हॅरिस रौफ ( ४) व नसीम शाह ( ३) यांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संपूर्ण संघ १९३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर इमाम-उल-हक व मोहम्मद रिझवान यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानचा विजय पक्का केला. सुपर ४चा हा पहिलाच सामना असल्याने पाकिस्तानने विजय मिळवून गटात २ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. 

विराटचा विक्रम मोडला म्हणून पाकिस्तानी नाचले, पण बाबर आजमची 'दांडी' उडताच...  

फखर जमानला ( २०) जीवदान मिळूनही काही खास करता आले नाही. ५ षटकानंतर स्टेडीयममधील एक फ्लड लाईट बंद झाली होती आणि ३० मिनिटानंतर ती दुरुस्त झाली. त्यानंतर शोरिफूल इस्लामने पाकिस्तानला पहिला धक्का देताना फखरला बाद केले. कर्णधार बाबर आजम व इमाम-उल-हक यांनी चांगला खेळ केला, परंतु तस्कीन अहमदने पाकिस्तानी कर्णधाराचा ( १७) दांडा उडवला.  इमाम व मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला विजयाच्या उंबरठ्यावर येऊन बसवले. इमाम ८४ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७८ धावांवर त्रिफळाचीत झाला. रिझवाननेही अर्धशतक झळकावून पाकिस्तानचा ७ विकेट्स राखून विजय पक्का केला. रिझवान ६३ धावांवर नाबाद राहिला आणि पाकिस्तानने ३९.३ षटकांत ३ बाद १९४ धावा करून विजय मिळवला.

तत्पूर्वी, बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन ( ५४) आणि मुश्फिकर रहिम ( ६५) यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह विक्रमी शतकी भागीदारी करून डाव सावरला होता. पण, शाकिबची विकेट पडली अन् पुढील ४६ धावांत ६ फलंदाज माघारी परतले. पहिल्या १० षटकांत त्यांचे मोहम्मद नईम ( २०), मेहिदी हसन मिराझ ( ०), लिटन दास ( १६) आणि तोवहिद हृदय ( २) हे चार फलंदाज माघारी परतले. शाकिबने  ५७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या आणि रहिमने ८७ चेंडूंत ६४ धावा केल्या. बांगलादेशचा डाव ३८.४ षटकांत १९३ धावांवर गडगडला.हॅरिस रौफने ४, नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :एशिया कप 2023पाकिस्तानबांगलादेश
Open in App