Asia Cup 2023: या वर्षी होणाऱ्या आशिया कपवरुन भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू आहे. ही स्पर्धा जर पाकिस्तानमध्ये खेळली तर आम्ही खेळणार नाही असं भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. आशिया चषक स्पर्धेवरुन गोंधळ सुरू आहे. यावर आता तोडगा निघू शकतो, पाकिस्तानने आता ही स्पर्धा युएई मध्ये खेळण्याची ऑफर बीसीसीआय ला दिली असल्याचे बोलले जात आहे.
या सामन्यात जर भारतीय टीम फायनल मध्ये पोहोचली तर तो सामना युएईमध्ये होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची तातडीची बैठक 4 फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये झाली. यापूर्वीच एसीसीने वेळापत्रक जाहीर केले होते, यात या स्पर्धेचे यजमान म्हणून पाकिस्तानचा उल्लेख नव्हता.
कराचीमध्ये माध्यमांशी बोलताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख नजम सेठी यांनी या संदर्भात माहिती दिली. काही दिवसातच आयसीसीची बैठक होणार असून यात पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. कारण या संदर्भात अजुनही चर्चा झालेली नाही, असंही नजम सेठी म्हणाले.
या सामन्यांचे यजमान पाकिस्तानकडेच राहणार आहे, हे सामने युएईमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. भारत जर अंतिम सामन्यात पोहोचला तर तो सामनाही युएईमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.
आशिया कप या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण बीसीसीआयचे सचिव आणि एसीसीचे प्रमुख जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगितले होते. यानंतर पाकिस्तानने असेही म्हटले होते की, असे झाल्यास ते यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायला येणार नाहीत.