Asia Cup 2023 Points Table: आशिया चषक 2023 चे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये झाले आहे. 30 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका व्यतिरिक्त भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. पाकिस्तान भारत आणि नेपाळ एका गटात आहेत. तर बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान एका गटात आहेत. सर्व संघ २-२ सामने खेळतील. त्यानंतर सुपर-4 मधील टॉप-2 संघांना अंतिम फेरीत स्थान मिळेल. आशिया चषक 2023 चा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाहूया सध्याचे पॉईंट्स टेबल...
भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे. नेपाळच्या संघाला पाकिस्तानने एकतर्फी पराभूत केले होते. त्यामुळे भारताच्या संघाकडूनही नेपाळविरूद्ध मोठ्या विजयाची आशा आहे. तसे झाल्यास भारताला गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची संधी मिळेल. पण जर भारतीय संघाचा नेपाळविरूद्धचा सामनाही पावसाने वाया गेला तर दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.
ब गटात चुरस
अफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेशने विजय मिळवल्यामुळे आता ब गटातील चुरस अधिकच वाढली आहे. बांगलादेशचे २ सामने झाले असून त्यात त्यांनी १ विजय आणि १ पराभव मिळवला आहे. श्रीलंकेने एक सामना खेळून बांगलादेशला पराभूत केले आहे. तर अफगाणिस्तानचा एकमेव सामना श्रीलंकेशी खेळला जाणार आहे. जर अफगाणिस्तानच्या संघाने श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला, तर या गटात नेट रन रेटच्या आधारे २ संघ पुढे येतील.