Join us  

१० चेंडूंत कुटल्या ४४ धावा! सदीरा समरविक्रमाचाच नारा, बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ चा श्रीलंकेतील टप्पा आजपासून सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 6:42 PM

Open in App

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ चा श्रीलंकेतील टप्पा आजपासून सुरू झाला. बांगलादेशला पाकिस्तानमध्ये झालेल्या सुपर ४ च्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. आज त्यांचा सामना कोलंबो येथे श्रीलंकेशी होतोय. बांगलादेशने नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यांनी चांगला खेळ करून बांगलादेशसमोर तगडे लक्ष्य उभे केले. कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा ( Sadeera Samarawickrama) यांनी अर्धशतकी खेळी केली. 

पथून निसंका आणि दिमुथ करुणारत्ने या सलामीच्या जोडीला चांगली सुरुवात करून देता आली नाही. हसन महमुदने चौथ्या षटकात करुणारत्नेला ( १८) माघारी पाठवले. त्यानंतर निसंका व कुसल मेंडिस यांनी डाव सावरला अन् दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. मेंडिसने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ७३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह त्याने ५० धावा केल्या. निसंका ६० चेंडूंत ४० धावा करून माघारी फिरला. चरिथा असलंका ( १०) व धनंजया डी सिल्वा ( ६) यांनाही अपयश आल्याने श्रीलंका अडचणीत सापडला होता.

सदीरा समरविक्रमाने सातत्य दाखवताना अर्धशतक पूर्ण केले आणि त्याला कर्णधार दासून शनाकाची साथ मिळाली. पण, ६० धावांची ही भागीदारी हसन महमुदने तोडली, दासून ३२ चेंडूंत २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. दुनिथ वेलालागे ( ३) रन आऊट झाला. पण, समरविक्रमाने दुसऱ्या बाजूने दमदार खेळ केला. सदीराने ७२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९३ धावा केल्या. श्रीलंकेच्या ५० षटकांत ९ बाद २५७ धावा झाल्या.

टॅग्स :एशिया कप 2023श्रीलंकाबांगलादेश
Open in App