Asia Cup 2023 Super 4 full schedule : आशिया चषक स्पर्धेतील ब गटाचा शेवटचा साखळी सामना अत्यंत चुरशीचा झाला. या गटातून बांगलादेशने आधीच सुपर ४ मधील पात्रता निश्चित केल्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खरी टक्कर होती. श्रीलंकेने २९१ धावांचा डोंगर उभा केला अन् अफगाणिस्तानला ३७.१ षटकांत हे लक्ष्य पार करण्याचे आव्हान ठेवले. अफगाणिस्तानने हार न मानता ३७.१ षटकांत २८९ धावांपर्यंत मजल मारली, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांना हार मानावी लागली. त्यामुळे ब गटातून श्रीलंकेने सर्वाधिक ४ गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश पक्का केला. यामुळे भारतीया संघाचे वेळापत्रकही अपडेट झाले.
'ते' २ नियम माहित नसल्याने अफगाणिस्तानचा घात झाला; श्रीलंकेविरुद्धचा हातचा सामना गेला
भारताने अ गटातून पाकिस्तानपाठोपाठ सुपर ४ मध्ये कालच धडक दिली. २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या इनिंग्जनंतर पावसाने धुमाकूळ घातला अन् सामना रद्द झाला होता. रविवारी नेपाळची इनिंग्ज झाली अन् भारताच्या २.१ षटकानंतर पावसाने एन्ट्री घेतली. अडीच तास पावसाने बॅटिंग केल्यानंतर भारतासमोर २३ षटकांत १४५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. रोहित शर्मा व शुबमन गिल या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताचा विजय ज पक्का केला आणि सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला होता.
भारताचं सुपर ४ मधील वेळापत्रक ( Schedule of Indian team in Super 4 )
१० सप्टेंबर - वि. पाकिस्तान
१२ सप्टेंबर - वि. श्रीलंका
१५ सप्टेंबर - वि. बांगलादेश
अन्य लढती
६ सप्टेंबर - पाकिस्तान वि. बांगलादेश
९ सप्टेंबर - श्रीलंका वि. बांगलादेश
१४ सप्टेंबर- पाकिस्तान वि. श्रीलंका
Web Title: Asia Cup 2023 Super 4 full schedule : Sri Lanka qualified for Super 4; India schedule has been updated, know when and whome against they play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.