Join us  

श्रीलंकेचा Super 4 मध्ये प्रवेश, भारताचं वेळापत्रक झालं अपडेट; जाणून घ्या कधी, कुठे, कुणाशी भेट

Asia Cup 2023 Super 4 full schedule : आशिया चषक स्पर्धेतील ब गटाचा शेवटचा साखळी सामना अत्यंत चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 11:13 PM

Open in App

Asia Cup 2023 Super 4 full schedule : आशिया चषक स्पर्धेतील ब गटाचा शेवटचा साखळी सामना अत्यंत चुरशीचा झाला. या गटातून बांगलादेशने आधीच सुपर ४ मधील पात्रता निश्चित केल्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खरी टक्कर होती. श्रीलंकेने २९१ धावांचा डोंगर उभा केला अन् अफगाणिस्तानला ३७.१ षटकांत हे लक्ष्य पार करण्याचे आव्हान ठेवले. अफगाणिस्तानने हार न मानता ३७.१ षटकांत २८९ धावांपर्यंत मजल मारली, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांना हार मानावी लागली. त्यामुळे ब गटातून श्रीलंकेने सर्वाधिक ४ गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश पक्का केला. यामुळे भारतीया संघाचे वेळापत्रकही अपडेट झाले.

'ते' २ नियम माहित नसल्याने अफगाणिस्तानचा घात झाला; श्रीलंकेविरुद्धचा हातचा सामना गेला

भारताने अ गटातून पाकिस्तानपाठोपाठ सुपर ४ मध्ये कालच धडक दिली. २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या इनिंग्जनंतर पावसाने धुमाकूळ घातला अन् सामना रद्द झाला होता. रविवारी नेपाळची इनिंग्ज झाली अन् भारताच्या २.१ षटकानंतर पावसाने एन्ट्री घेतली. अडीच तास पावसाने बॅटिंग केल्यानंतर भारतासमोर २३ षटकांत १४५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. रोहित शर्मा व शुबमन गिल या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताचा विजय ज पक्का केला आणि सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला होता. 

भारताचं सुपर ४ मधील वेळापत्रक ( Schedule of Indian team in Super 4 ) १० सप्टेंबर - वि. पाकिस्तान१२ सप्टेंबर - वि. श्रीलंका१५ सप्टेंबर - वि. बांगलादेश अन्य लढती६ सप्टेंबर - पाकिस्तान वि. बांगलादेश९ सप्टेंबर - श्रीलंका वि. बांगलादेश१४ सप्टेंबर- पाकिस्तान वि. श्रीलंका 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध श्रीलंकाभारत विरुद्ध पाकिस्तानभारत विरुद्ध बांगलादेश
Open in App