Asia Cup 2023 Super 4s Schedule: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये भारताने धडक दिली. २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या इनिंग्जनंतर पावसाने धुमाकूळ घातला अन् सामना रद्द झाला. आज नेपाळची इनिंग्ज झाली अन् भारताच्या २.१ षटकानंतर पावसाने एन्ट्री घेतली. अडीच तास पावसाने बॅटिंग केल्यानंतर भारतासमोर २३ षटकांत १४५ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. रोहित शर्मा व शुबमन गिल या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताचा विजय सहज पक्का केला आणि सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला.
नेपाळवर दणदणीत विजयासह भारत Super 4s मध्ये; रोहित, शुबमन यांची दमदार खेळी
अ गटात भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी ३ सामने झाले, परंतु यजमान असल्यने A1 चा मान पाकिस्तानला मिळाला आहे, तर A2 भारत आहे. ब गटात श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक मॅच जिंकली आहे. बांगलादेशला पहिला सामना गमवावा लागला होता, पंरतु त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे उद्याच्या श्रीलंका-अफगाणिस्तान सामन्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. श्रीलंका जिंकल्यास ब गटातून अव्वल स्थानासह ते सुपर ४ मध्ये जातील. अफगाणिस्तानने विजय मिळवल्यास नेट रन रेटवर दोन्ही संघ ठरतील. कारण तीन्ही संघांचे प्रत्येकी २ गुण झालेले असतील. पावसामुळे सुपर ४ चे सामने कोलंबो येथून हम्बातोंटा येथे हलवण्यात आले आहेत.
- १० सप्टेंबर - भारत वि. पाकिस्तान, हम्बातोंटा
- १२ सप्टेंबर- भारत वि. ब गटातील अव्वल, हम्बातोंटा
- १५ सप्टेंबर- भारत वि. ब गटातील दुसरा संघ, हम्बातोंटा