Join us  

भारतीय संघापेक्षा आम्ही भारी, कारण...! INDvsPAK सामन्यापूर्वी बाबर आजमनचा मोठा दावा

Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार असल्याचा आत्मविश्वास बाबर आजमने ( Babar Azam) व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 3:31 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार असल्याचा आत्मविश्वास बाबर आजमने ( Babar Azam) व्यक्त केला आहे. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत अफगाणिस्तानविरुद्ध  वन डे मालिका खेळला आहे आणि त्याचाच दाखला देताना भारताविरुद्ध आमचे पारडे जड असल्याचा दावा बाबरने केला. वन डे मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ जुलै महिन्यात कसोटी मालिका खेळलेला आणि शिवाय लंका प्रीमिअर लीगमध्येही पाकिस्तानी खेळाडू खेळले आहेत.  

दुसरीकडे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेत दाखल झाला, परंतु त्यांचे दोन्ही सामने पावसामुळे बाधित झाले. पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताच्या इनिंग्जनंतर पावसामुळे रद्द करावा लागला. नेपाळविरुद्धही भारतीय फलंदाजांना २३ षटकंच खेळायला मिळाली. त्यामुळेच पाकिस्तानच्या खेळाडूंना येथील खेळपट्टीचा जास्त अनुभव आहे आणि हिच बाब संघासाठी फायद्याची असल्याचे बाबरने म्हटले.

''पाकिस्तान आणि श्रीलंका येथे आम्ही सातत्याने खेळतोय. त्यामुळे भारतापेक्षा आमची बाजू वरचढ आहे असे तुम्ही म्हणू शकता. मागील दोन महिन्यांहून अधिक आम्ही श्रीलंकेत खेळत आहोत. येथे आम्ही कसोटी खेळलो, अफगाणिस्तानविरुद्ध वन डे मालिका खेळलो आणि लंका प्रीमिअऱ लीग... त्यामुळे आमच्याकडे अडव्हांटेज आहे,''असे बाबरने म्हटले.

सुपर ४ च्या पहिल्या लढतीत पाकिस्तानने ७ विकेट्स राखून बांगलादेशवर विजय मिळवला आहे. आता सुपर ४ चे सर्व सामने कोलंबो येते होणार आहे. पण, IND vs PAK सामन्यावर पावसाचे सावट आहे आणि त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे.   

 

 

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम
Open in App