Asia Cup फायनलमध्ये बांगलादेशनं मारली बाजी; टीम इंडियाला दणका देत सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

सर्वाधिक आठ वेळच्या चॅम्पियन असलेल्या भारतीय संघावर पराभवाची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:50 IST2024-12-08T17:42:53+5:302024-12-08T17:50:29+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2024 Bangladesh U19 vs India U19, Fina Bangladesh U19 won by 59 runs Against India U19 And lift the trophy | Asia Cup फायनलमध्ये बांगलादेशनं मारली बाजी; टीम इंडियाला दणका देत सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

Asia Cup फायनलमध्ये बांगलादेशनं मारली बाजी; टीम इंडियाला दणका देत सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ACC U19 Asia Cup, 2024 Bangladesh U19 vs India U19, Final  : अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशच्या संघानं मोहम्मद अमनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पराभवाचा दणका देत सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरले.  आठ वेळच्या आशिया कप विजेत्या भारतीय संघासमोर बांगलादेशच्या संघानं १९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ ३५.२ षटकात १३९ धावांत आटोपला.  बांगलादेशच्या संघाने ५९ धावांनी सामना जिंकत जेतेपदावर कब्जा केला.

ना IPL मधील 'करोडपती' टिकला; ना या स्पर्धेत शतकी खेळी करणाऱ्या कॅप्टनचा जलवा दिसला

बांगलादेशच्या संघाला  १९८ धावांवर रोखल्यावर भारतीय संघ अगदी आरामात फायल बाजी मारेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर आयुष म्हात्रे ८ चेंडूचा सामना करून एका धावेवर तंबूत परतला.  आयपीएलच्या मेगा लिलावात कोट्यवधीची बोली लागलेल्या वैभव सूर्यंवशीनं मागील दोन सामन्यात दमदार फिफ्टी झळकावली होती. पण अंतिम सामन्यात त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तो अवघ्या ९ धावा करून परतला. आंद्रे सिद्धार्थ आणि केपी कार्तिकेया यांनी भारतीय संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ ३५ चेंडूत २० धावा आणि केपी ४३ चेंडूत २१ धावा करून माघारी फिरले. आघाडीच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर सामन्याला कलाटणी देण्याची जबाबदारी ही कर्णधार मोहम्मद अमान याच्यावर येऊन पडलीय तो ६५ चेंड़ूत २६ धावा करून परतला. तळाच्या फलंदाजीत हार्दिक राजनं २१ चेंडूत २४ धावा केल्या. त्याच्याशिवाय चेतन शर्मानं केलेल्या १० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

बांगलादेशच्या विजयात या गोलंदाजांनी बजावली चोख भूमिका

बांगलादेशचा कर्णधार  अझीझुल हाकीम तमिम आणि इक्बाल हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत भारतीय संघाला अडचणीत आणले.  या दोघांशिवाय अल फहाद याने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानेच सलामीवीर आयुष म्हात्रेला तंबूचा रस्ता दाखवत संघाला दमदार सुरुवात करून दिली.   रिझान हुसैन आणि मारुफ यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Asia Cup 2024 Bangladesh U19 vs India U19, Fina Bangladesh U19 won by 59 runs Against India U19 And lift the trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.