Join us  

संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आशिया कप

भारतात पाकिस्तान संघाला खेळण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आल्यामुळे आगामी आशिया चषक भारताऐवजी संयुक्त अरब अमिरात येथे खेळवण्याचा निर्णय आशिया क्रिकेट परिषद (एसीसी)ने घेतला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:45 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतात पाकिस्तान संघाला खेळण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आल्यामुळे आगामी आशिया चषक भारताऐवजी संयुक्त अरब अमिरात येथे खेळवण्याचा निर्णय आशिया क्रिकेट परिषद (एसीसी)ने घेतला आहे. क्वालालंपूर येथील एसीसीच्या मुख्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुबई आणि अबुधाबी येथे १३ ते २८ सप्टेंबरदरम्यान आशिया चषक खेळवण्यात येणार आहे.या बैठकीत बीसीसीआयतर्फे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल चौधरी उपस्थित होते, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नजम सेठी यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जौहरी यांनी आशिया चषक अन्यत्र खेळवण्यात यावा, अशी मागणी केली होती. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर वरील माहिती दिली. भारताऐवजी अन्यत्र ठिकाणी आशिया कपचे आयोजन करण्यात यावे, यासाठी बीसीसीआय आग्रही होते. या स्पर्धेत पाकचा सहभाग असल्यामुळे बीसीसीआयला यासाठी भारत सरकारच्या परवानगीची आवश्यकता भासणार होती व सध्याची परिस्थिती पाहता, ती मिळण्याची शक्यता जवळजवळ धूसरच होती.