अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 02:12 PM2023-08-29T14:12:14+5:302023-08-29T14:13:56+5:30

whatsapp join usJoin us
Asia cup finally the 9 year wait is over A special moment to come in King virat Kohli's career | अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आता आशिया चषकात अॅक्शनमध्ये दिसणार आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होत असून अंतिम सामना 17 सप्टेंबरला खेळला जाईल. भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानसोबत होणार आहे. विराट कोहलीसाठी ही स्पर्धा विशेष असणार आहे. खरे तर, विराट कोहलीच्या कारकिर्दीत तब्बल 9 वर्षानंतर एक विशेष क्षण येणार आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

9 वर्षांची प्रतिक्षा संपणार -
आशिया कप-2023 साठी टीम इंडिया आजच श्रीलंकेला रवाना होणार आहे. यावेशी आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाणार आहे. यापूर्वीची एकदिवसीय आशिया चषक स्पर्धा 2018 मध्ये झाली होती. मात्र विराट कोहली या स्पर्धेचा भाग नव्हता. यामुळे तो 9 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये आशिया कप खेळणार आहे. यापूर्वी या फॉर्म्याटमध्ये त्याने 2014 मध्ये आशिया चषकात खेळला होता.

वनडे आशिया चषकातील विराटची कामगिरी अशी -
एकदिवसीय आशिया चषकात विराट कोहलीने 10 डावांत तब्बल 61.3 च्या सरासरीने 613 धावा कुटल्या आहेत. एकदिवसीय आशिया चषकात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 183 एवढी आहे. ही खेळी त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळली केली होती. त्याने एकदिवसीय आशिया चषकात 1 अर्धशतक आणि 3 शतके ठोकली आहे. मात्र, 2014 च्या आशिया चषकात भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. या स्पर्धेत भारताने केवळ दोनच सामने जिंकले होते. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकाचे वेळापत्रक असे - 
30 ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
31 ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
2 सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
3 सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
4 सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
5 सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
6 सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
9 सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
10 सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
12 सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
14 सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
15 सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
17 सप्टेंबर - फायनल

Web Title: Asia cup finally the 9 year wait is over A special moment to come in King virat Kohli's career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.