Asia Cup Indian Team Announced | नवी दिल्ली : मोठ्या कालावधीपासून क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज अखेर आला. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आगामी आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत संघ निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संघाची घोषणा केली. दीर्घकाळ दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन झाले आहे. तर युझवेंद्र चहलला डच्चू देण्यात आला आहे. खरं तर सलामीवीर शिखर धवनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिखर धवनला वगळल्यानंतर अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला. "शिखर धवन हा भारतासाठी उत्कृष्ट ठरला आहे. पण, आताच्या घडीला रोहित शर्मा, शुबमन गिल आणि इशान किशन हे आमचे तीन पसंतीचे सलामीवीर आहेत", असे आगरकर यांनी स्पष्ट केले.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव खेळाडू)
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल