Asia Cup Indian Team Announced : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात नवी दिल्ली येथे जवळपास दोन-अडीच तास बैठक झाली. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांचा फिटनेस हा या बैठकीचा प्रमुख गाभा होता. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे वन डे संघाचे उप कर्णधारपद त्याच्याकडे जाणे अपेक्षित होते, परंतु हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी कायम ठेवली गेली.
आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर नेपाळ ( ४ सप्टेंबर)विरुद्ध भारत खेळेल. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे दोघंही तंदुरुस्त असल्याचा अहवाल NCA ने सादर केला असल्याने भारताला आनंदवार्ता मिळाली आहे. पण, लोकेशवर यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्याला खेळवण्याची घाई योग्य ठरेल का, हा प्रश्न आहेच. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना आशिया चषकासाठीच्या संघात स्थान दिले गेले आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन ( राखीव खेळाडू) ( Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, KL Rahul, Ishan Kishan, Hardik Pandya (VC), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna)
Backup - Sanju Samson
आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Asia Cup Indian Team Announced : Tilak Varma named in India's Asia Cup squad; Shreyas Iyer and KL Rahul also return
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.