Join us  

Big Breaking: आशिया चषक स्पर्धेतून लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन; तिलक वर्माची सरप्राईज निवड

Asia Cup Indian Team Announced : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 1:32 PM

Open in App

Asia Cup Indian Team Announced : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात नवी दिल्ली येथे जवळपास दोन-अडीच तास बैठक झाली. लोकेश राहुलश्रेयस अय्यर यांचा फिटनेस हा या बैठकीचा प्रमुख गाभा होता. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे वन डे संघाचे उप कर्णधारपद त्याच्याकडे जाणे अपेक्षित होते, परंतु हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी कायम ठेवली गेली.

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर नेपाळ ( ४ सप्टेंबर)विरुद्ध भारत खेळेल. लोकेश राहुलश्रेयस अय्यर हे दोघंही तंदुरुस्त असल्याचा अहवाल NCA ने सादर केला असल्याने भारताला आनंदवार्ता मिळाली आहे. पण, लोकेशवर यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्याला खेळवण्याची घाई योग्य ठरेल का, हा प्रश्न आहेच. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना आशिया चषकासाठीच्या संघात स्थान दिले गेले आहे.  

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन ( राखीव खेळाडू)  ( Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, KL Rahul, Ishan Kishan, Hardik Pandya (VC), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna) 

 

Backup - Sanju Samson

आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल 

टॅग्स :एशिया कप 2022शुभमन गिलश्रेयस अय्यरलोकेश राहुल
Open in App