Asia Cup IndvsPak: जेव्हा संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा आमने-सामने येतात..., मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

रविवारी आशिया चषकात पाकिस्तानविरोधात रवींद्र जडेजाने 35 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:11 PM2022-08-29T14:11:16+5:302022-08-29T14:12:15+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup IndvsPak: Sanjay Manjrekar faced Ravindra Jadeja in Asia Cup; Jadeja laughed at he very first question | Asia Cup IndvsPak: जेव्हा संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा आमने-सामने येतात..., मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup IndvsPak: जेव्हा संजय मांजरेकर आणि रविंद्र जडेजा आमने-सामने येतात..., मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup IndvsPak: आशिया चषकात रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान(IND vs PAK) यांच्यात धमाकेदार सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India beat Pakistan) 5 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या शानदार कामगिरीमुळे माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी जडेजाला मुलाखतीसाठी बोलावले. हा क्षण चाहत्यांसाठी खूप मजेशीर ठरला कारण जडेजा आणि मांजरेकर यांच्यात वादग्रस्त इतिहास राहिला आहे.

मुलाखतीदरम्यान संजय मांजरेकरांनी रवींद्र जडेजाला सर्वात आधी विचारले, "तुला माझ्याशी बोलण्यात अडचण नाही ना, जड्डू?". यावर जडेचा हसून मांजरेकरांना म्हणाला "हो, मला काहीच हरकत नाही." जडेजा आणि मांजरेकर यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मांजरेकर-जडेजा वाद
मागे एकदा रवींद्र जडेजा खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हा संजय मांजरेकरांनी जडेजावर 'बिट्स अँड पीस प्लेअर' अशी टिप्पणी केली होती. 'बिट्स अँड पीस प्लेअर' म्हणजे, जो खेळात अतिशय कमी योगदान देऊ शकतो. मांजरेकरांच्या कमेंटवर जडेजाने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती.

Web Title: Asia Cup IndvsPak: Sanjay Manjrekar faced Ravindra Jadeja in Asia Cup; Jadeja laughed at he very first question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.