Asia Cup 2023 Schedule : आशिया चषक २०२३ स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर झाले. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालवधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या तारखा आधीच जाहीर केल्या होत्या. पण, यात कोणता संघ कोणाशी कधी भिडेल हे ठरले नव्हते. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत.
भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. दोन्ही गटातील दोन अव्वल संघ सुपर ४ मध्ये खेळतील आणि त्यानंतर दोन अव्वल संघ फायनल खेळतील. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून आशिया चषक यंदा ५०-५० षटकांचा होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) मुलतान आणि लाहोर येथे आशिया चषक स्पर्धेचे ४ सामने खेळवणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना २ सप्टेंबरला कँडी येथे होईल. त्यानंतर १० सप्टेंबरला सुपर ४ मध्ये उभय संघ पुन्हा समोरासमोर येण्याची शक्यता आहे आणि फायनलमध्येही हे संघ एकमेकांना भिडू शकतात.
आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: Asia Cup schedule announced, ndia to play Pakistan on Sept 2 in Kandy and are expected to play again on Sept 10, know the dates, venues, time & full fixtures
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.