Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे आजपासून सुरू झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या महिला ट्वेंटी-२० सामन्यात गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. चीनमधील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करून इंडोनेशियाच्या महिला संघाने ४ बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मंगोलियाचा महिला संघ अवघ्या १५ धावांत गारद झाला. त्यामुळे मंगोलियाच्या महिला संघाला १७२ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
मंगोलियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडोनेशियाचा सलामीवीर नी पुटू अयु नंदा सकरीनी आणि लुह डेवी यांच्यात १०६ धावांची भक्कम भागीदारी झाली. त्यानंतर साकरिनीने ३१ चेंडूंत चार चौकार आणि एक षटकारासह ३५ धावा केल्या. यानंतर डेव्हीने ४८ चेंडूत १० चौकारांसह ६२ धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे इंडोनेशियाच्या महिला संघाने ४ बाद १८७ धावा केल्या.
१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलियाचा एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकली नाही. परिस्थिती अशी होती की त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १५ धावांवर बाद झाला. मंगोलियाच्या महिला संघाच्या सात फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. बटजरगल इचिनखोरलूला सर्वाधिक पाच धावा करता आल्या. मंगोलियाचा संघ १० षटकांत १५ धावांवर बाद झाला आणि त्यांना १७२ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियासाठी अँड्रियानीने तीन षटकांत ८ धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. रहमावती आणि लुह डेव्हीने प्रत्येकी दोन विकेट्स