Join us  

टी२०चा नवा 'सम्राट'; नेपाळच्या दिपेंद्रने मोडला युवराज सिंगचा विक्रम, मारले ८ षटकार

Asian Games 2023: नेपाळने प्रथम फलंदाजी करताना अनेक विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 1:11 PM

Open in App

नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंह ऐरीने आज भारतीय क्रिकेट संघाचा युवराज सिंगचा सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडला आहे. आशियाई स्पर्धेत दीपेंद्रने मंगोलियाविरुद्ध केवळ ९ चेंडूत अर्धशतक झळकावले. याआधी हा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. युवराजने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. 

चीनमधील हांगझोऊ येथे २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपेंद्र सिंग ऐरीने मंगोलियाविरुद्ध ९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या. आता टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम दीपेंद्र सिंग ऐरीच्या नावावर झाला आहे. यापूर्वी टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावावर होता. युवराज सिंगने २००७च्या टी-ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डर्बनमध्ये केवळ १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

नेपाळने प्रथम फलंदाजी करताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. २० षटकात नेपाळने ३०० धावा करण्याचा विक्रमही केला आहे. नेपाळने निर्धारित २० षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात ३१४ धावा फलकावर लावल्या. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एका डावात ३०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम नेपाळच्या नावावर झालाय. याआधी असा पराक्रम कुणालाही करता आला नव्हता. टी२०मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आफगाणिस्तान संघाच्या नावावर होता. अफगाणिस्तान संघाने तीन विकेटच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. मात्र अफगाणिस्तानचा हा विक्रही नेपाळने मोडीत काढला आहे.

T20मधील सर्वात वेगवान अर्धशतक

दीपेंद्र सिंग ऐरी - ९* चेंडूयुवराज सिंग - १२ चेंडूख्रिस गेल - १२ चेंडूहजरतुल्ला झाझई - १२ चेंडू

कुशल मल्लाचे सर्वात वेगवान शतक-

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून, कुशल मल्लाने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद आंतरराष्ट्रीय धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला. मल्‍लाने केवळ ३४ शतक झळकावले. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर यांचे विक्रम मोडीत काढले. शर्मा आणि मिलर यांनी ३७ चेंडूत शतक झळकावले होते. 

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३युवराज सिंगनेपाळटी-20 क्रिकेट