Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये जगातील एकूण १४ पुरुष संघ आणि ८ महिला संघ सहभागी होणार आहेत. १४ संघ एकूण १७ सामने खेळतील आणि विजेत्या संघाला सुवर्णपदक मिळेल. २८ सप्टेंबर रोजी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये चीन, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मंगोलिया, जपान, कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, मालदीव, हाँगकाँग आणि थायलंड हे देश सहभागी होणार आहेत.
भारतीय संघाला धक्का! प्रमुख जलदगती गोलंदाज जखमी, उम्रान मलिकला बोलावणार
आशिया चषक २०२३ सध्या श्रीलंकेत आयोजित केला जात असून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. १७ तारखेला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. आशिया चषकमध्ये वरिष्ठ संघ सहभागी होत आहे तोच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. त्याच वेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली युवा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला जाणार आहे. आशियाई स्पर्धेत ७ ऑक्टोबरला India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच होण्याची शक्यता आहे.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ आयसीसी रँकिंगमध्ये आघाडीवर असल्याने त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळावे लागणार आहे. अशा परिस्थितीत या चार संघांना पहिल्या फेरीत वेगवेगळ्या संघांशी मुकाबला करावा लागणार आहे. टीम इंडिया ३ ऑक्टोबरला पहिला सामना खेळणार आहे आणि त्याच दिवशी पाकिस्तानलाही आपला सामना खेळायचा आहे. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याच दिवशी श्रीलंका आणि बांगलादेशचे सामनेही खेळायचे आहेत. मात्र, हे ४ संघ कोणत्या संघासोबत खेळणार हे सध्या निश्चित झालेले नाही. पहिला उपांत्य सामना ६ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल ज्यामध्ये उपांत्यपूर्व १ चा विजेता संघ आणि उपांत्यपूर्व ४ चा विजेता संघ यांच्यात लढत होईल.त्याच दिवशी दुसरा उपांत्य सामना देखील होईल ज्यामध्ये उपांत्यपूर्व २ आणि उपांत्यपूर्व ३ मधील विजेत्या संघांमध्ये लढत होईल. अशा परिस्थितीत, भारत आणि पाकिस्तानने आपापले सामने जिंकल्यास ७ ऑक्टोबर रोजी सेमी-फायनल १ चा विजेता संघ आणि सेमी-फायनल २ मधील विजेता संघ यांच्यात सुवर्णपदक सामना होईल.