Asian Games 2023 Quarter-Finals in Cricket : आशियाई स्पर्धा २०२३ साठी भारताचा क्रिकेट संघ चीनला पोहोचला असून मंगळवारी संघाला पहिला सामना खेळायचा आहे. वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी नियमित खेळाडू घाम गाळत असताना, युवा संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे ध्येय घेऊन येथे दाखल झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेतील महिला क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले आहे आणि आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली पुरुष क्रिकेट संघावर ती जबाबदारी आहे. या संघात यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोईसारखे आयपीएल स्टार्स आहेत. फारसा अनुभव नसताही हा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जातोय.
स्वप्ना बर्मनचे भारतीय नंदिनीवर आरोप, 'ती ट्रान्सजेंडर आहे, मला पदक परत द्या नाहीतर...
टीम इंडियाच्या मानांकनामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला थेट प्रवेश मिळाला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर नेपाळचा संघ आहे. ३ ऑक्टोबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट मैदानावर सकाळी ६.३० पासून नेपाळ आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषकात टीम इंडियाने नेपाळवर १० विकेट्सने विजय मिळवला होता. नेपाळचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाने मंगोलियाचा २७३ धावांनी पराभव केला आणि त्यानंतर संघाने मालदीवचा १३८ धावांनी पराभव केला. नेपाळने मंगोलियाविरुद्ध अनेक विक्रम मोडीत काढले. ज्यामध्ये टीम ट्वेंटी-२० मध्ये ३००+ धावा करणारा पहिला संघ बनला आहे.
नेपाळने ३ विकेट गमावून ३१४ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात कुशल मल्लाने ( ३५ चेंडूंत) रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरचा संयुक्त ट्वेंटी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम मोडला. दीपेंद्रने ९ चेंडूत अर्धशतक झळकावले, तर युवराज सिंगचा १२ चेंडूत सर्वात वेगवान ट्वेंटी-२० अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढती
भारत वि. नेपाळ
पाकिस्तान वि. हाँगकाँग
श्रीलंका वि. अफगाणिस्तान
बांगलादेश वि. मलेशिया
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश सरमा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाशदीप, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. .
Web Title: Asian Games 2023 Quarter-Finals in Cricket : India will face Nepal tomorrow in the Asian Games from 6.30am, check full sqaud and schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.