BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री

Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी पुरुष संघाची घोषणा BCCI ने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:00 PM2023-07-14T23:00:14+5:302023-07-14T23:00:46+5:30

whatsapp join usJoin us
Asian Games 2023: Ruturaj Gaikwad appointed as the captain of Indian team in Asian Games. The men’s cricket competition will take place from 28th September to 8th October in a T20 format. | BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री

BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी पुरुष संघाची घोषणा BCCI ने केली आहे. शिखर धवन याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवले जाईल अशी चर्चा होती. पण, बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवले आहे आणि आयपीएल गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, राहुल त्रिपाठी यांना संधी दिली आहे. २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पुरुष क्रिकेट सामने होणार आहेत. 


२०१० व २०१४च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळलं गेलं, परंतु बीसीसीआयने संघ पाठवणे गरजेचे नाही समजलं. आशियाई स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. जकार्ता येथे २०१८ साली पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट बाद करण्यात आले होते. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगलादेशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे.  


भारताचा पुरूष संघ - ऋतुराज गायकवाड ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग ( यष्टिरक्षक); राखीव - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन ( NEWS 🚨- Team India (Senior Men) squad for 19th Asian Games: Ruturaj Gaikwad (Captain), Yashasvi Jaiswal, Rahul Tripathi, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Avesh Khan, Arshdeep Singh, Mukesh Kumar, Shivam Mavi, Shivam Dube, Prabhsimran Singh (wk). Standby list of players: Yash Thakur, Sai Kishore, Venkatesh Iyer, Deepak Hooda, Sai Sudarsan.) 


भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती माधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष ( यष्टिरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली शर्वणी, तितास सधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कानिका अहुजा, उमा चेत्री ( यष्टिरक्षक), अनुषा बारेड्डी, राखीव खेळाडू - हर्लीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, साईका इशाक, पूजा वस्त्राकर 
 

 

Web Title: Asian Games 2023: Ruturaj Gaikwad appointed as the captain of Indian team in Asian Games. The men’s cricket competition will take place from 28th September to 8th October in a T20 format.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.