Asian Games 2023 : यशस्वी जैस्वालने मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त रैना, लोकेशलाही टाकले मागे

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेपाळ विरुद्ध भारत यांच्यातल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यशस्वी जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal) दबदबा पाहयला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:20 PM2023-10-03T14:20:00+5:302023-10-03T14:26:19+5:30

whatsapp join usJoin us
Asian Games 2023 : Yashasvi Jaiswal becomes the YOUNGEST Indian to score a T20I century   | Asian Games 2023 : यशस्वी जैस्वालने मोडला शुबमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२०त रैना, लोकेशलाही टाकले मागे

Yashasvi Jaiswal becomes the YOUNGEST Indian to score a T20I century

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेपाळ विरुद्ध भारत यांच्यातल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यशस्वी जैस्वालचा ( Yashasvi Jaiswal) दबदबा पाहयला मिळाला. त्याने केवळ ४८ चेंडूत १०० धावा चोपल्या आणि त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने २०२ धावांचा डोंगर उभा केला. यशस्वीला ऋतुराज गायकवाड ( २५), शिवम दुबे ( २५*) आणि रिंकू सिंग ( ३७*) यांची साथ मिळाली. नेपाळला ९ बाद १७९ धावा करता आल्या आणि भारताने २३ धावांनी सामना जिंकला. यशस्वीने आजच्या शतकासोबत शुबमन गिल ( Shubman Gill) च्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्डही मोडला.  

४२५ धावा, १४ षटकार, ५३ चौकार! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त धावांची त्सुनामी


प्रथम फलंदाजी करताना यशस्वी आणि ऋतुराज यांनी भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. दोघांनी ९.५ षटकांत १०३ धावा फलकावर चढवल्या. त्यानंतर तिलक वर्मा ( २) व जितेश शर्मा ( ५) झटपट माघारी परतल्याने भारताची धावगती काहीशी मंदावली होती. पण, यशस्वीने ८ चौकार व ७ खणखणीत षटकारांसह १०० धावा चोपल्या. शिवम व रिंकू यांनी २२ चेंडूंत ५२ धावांची फटकेबाजी केली आणि संघाला २०२ धावांपर्यंत पोहोचवले. रिंकूने १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३७ धावा चोपल्या. 


त्यानंतर आवेश खान व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत नेपाळला धक्के दिले. दिपेंद्र सिंग ऐरीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. नेपाळने कडवी टक्कर दिली, परंतु ते २३ धावांनी कमी पडले. यशस्वीने मात्र विक्रम नोंदवला. त्याने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर म्हणून शुभमन गिलचा विक्रम मागे टाकला. यशस्वीने २१ वर्ष व २७९ दिवसांचा असताना हा पराक्रम केला. शुबमनने २३ वर्ष व १४६ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त ( वि. न्यूझीलंड) शतक झळकावले होते. तेव्हा त्याने सुरेश रैना ( २३ वर्ष व १५६ दिवस) आणि लोकेश राहुल ( २४ वर्ष व १३१ दिवस) यांचा विक्रम मोडला होता. 

Web Title: Asian Games 2023 : Yashasvi Jaiswal becomes the YOUNGEST Indian to score a T20I century  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.