PAK vs AFG: आसिफ अलीला बाकीच्या टूर्नामेंटमधून बॅन करा; अफगाणिस्तानच्या माजी खेळाडूची मागणी 

आसिफ अलीला इतर टूर्नामेंटमधून बॅन करायला हवे अशी मागणी अफगाणिस्तानच्या खेळाडूने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 01:55 PM2022-09-08T13:55:53+5:302022-09-08T13:56:50+5:30

whatsapp join usJoin us
Asif Ali and should be ban from the rest of the tournament, said that Gulbadin Naib | PAK vs AFG: आसिफ अलीला बाकीच्या टूर्नामेंटमधून बॅन करा; अफगाणिस्तानच्या माजी खेळाडूची मागणी 

PAK vs AFG: आसिफ अलीला बाकीच्या टूर्नामेंटमधून बॅन करा; अफगाणिस्तानच्या माजी खेळाडूची मागणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सुपर-4 मध्ये पराभूत झालेल्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानचा आसिफ अली बाद होताच सामन्याला गालबोट लागले. कारण फरीद अहमदने आसिफ अलीचा बळी घेतल्यावर पाकिस्तानी खेळाडूचा ताबा सुटला आणि त्याने मारण्यासाठी बॅट उचलली. बाद झाल्यानंतर आसिफ पॅव्हेलियनमध्ये परतत असताना दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र पंच आणि खेळाडूंनी केलेल्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. आसिफ अलीचा रूद्रावतार पाहून सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका होत असताना आता अफगाणिस्तानच्या माजी खेळाडूने त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गुलबदिन नायबने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "हा आसिफ अलीचा अत्यंत मूर्खपणा आहे. त्यामुळे त्याच्यावर बाकीच्या टूर्नामेंटमधून बंदी घातली पाहिजे, कोणत्याही गोलंदाजाला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे पण शारीरिक असणे अजिबात मान्य नाही." अफगाणिस्तानच्या खेळाडूच्या म्हणण्यानुसार आसिफ अलीला इतर स्पर्धेतून बॅन करायला हवे, अशी मागणी त्याने आयसीसीकडे केली आहे. 


 
पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रिक
पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर-4 मध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. हॉंगकॉंगला मोठ्या अंतराने पराभूत करून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये जागा मिळवली होती. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. अखेर 20 षटकांमध्ये 6 बाद 129 एवढी धावसंख्या करून अफगाणिस्तानने 130 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला घाम फोडला. मात्र अखेरच्या षटकात पाकिस्तानने निसटता विजय मिळवून विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावा करून सामना आपल्या नावावर केला. 


 

Web Title: Asif Ali and should be ban from the rest of the tournament, said that Gulbadin Naib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.