विशाखापट्टणम : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमकतेचा धसका विंडीजचा कर्णधार कीरोन पोलार्ड यानेही घेतलेला दिसतो. नको त्या ठिकाणी आक्रमक होण्याची विराटची वृत्ती आपल्या पचनी पडत नसल्याचे मत पोलार्डने काल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर व्यक्त केले.‘विराटला अखेर झाले तरी काय?,’ असा प्रश्न करीत पोलार्डने टी२० मालिकेत विराटने केलेल्या ‘नोटबुक सेलिब्रेशन’वर आक्षेप नोंदविला. ‘चेन्नईतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पंच शॉन जॉर्ज यांनी रवींद्र जडेजाच्या धावबादचा निर्णय तिसºया पंचावर सोपविताच विराटने जी आक्रमकता दाखवली तीदेखील समजण्यापलीकडची होती,’ असेही पोलार्डने म्हटले.दुसरी एकदिवसीय लढत १०७ धावांनी गमावल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार किएरॉन पोलार्डला भारतीय कर्णधार विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी पोलार्ड याने सांगितले की, ‘कोहली इतका आक्रमक का, हे त्यालाच विचारा. मला काही कळेनासे झाले आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच त्याला विचारा.’ दुसºया एकदिवसीय सामन्यातील पराभवाबद्दल पोलार्ड म्हणाला,‘आम्ही सुस्थितीत होतो, मात्र सलग गडी बाद होत गेल्यामुळे दडपण वाढले. लक्ष्याचा पाठलाग करतेवेळी वारंवार चुका होत असल्याचे मी मान्य करतो.’रोहित शर्मा याला ७० धावांवर शिमरोन हेटमायर याने जीवदान दिले. तरीही पोलार्डने क्षेत्ररक्षणाचा बचाव करीत, ‘आमचे क्षेत्ररक्षण बºयापैकी चांगलेच होते,’ असे सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये चांगलीच कामगिरी झाली. अखेर आम्हीही मानुष्य आहोत. आमच्या चुकांचे वारंवार प्रक्षेपण केले जात असल्याने, आमच्याबाबत चाहत्यांची मते चुकीची बनत आहेत.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट इतका आक्रमक का, हे त्यालाच विचारा
विराट इतका आक्रमक का, हे त्यालाच विचारा
किएरॉन पोलार्ड ; अतिआक्रमकता पटत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 4:49 AM