नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी 'Barefoot' या पुस्तकात भारतीय क्रिकेट आणि खेळाडू यांच्याबद्दल बरेच काही लिहीले आहे. त्यांनी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरबाबात विविदास्पद माहिती दिली आहे. पण, याच पुस्तकात त्यानी माजी कर्णधार महेंद्रसिंग दोनीचे गोडवे गायले आहे. शिवाय यात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकणातील आरोपी एस श्रीसंत याच्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. याच पुस्तकात त्यांनी भारतीय संघासोबत काम करत असतानाच्या मोठ्या चुकीचा खुलासा केला. भारतीय खेळाडूंना सेक्स करण्याचा मस्करीत दिलेला सल्ला, हा कारकिर्दीतील मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले.
धोनीच्या शिस्तीचा नाद करायचा नाय; सरावाला उशिरा पोहोचल्यास होती 'डेंजर' शिक्षा भारतीय संघाच्या सरावाला उशीला आल्यावर धोनी खेळाडूंना कोणती शिक्षा द्यायचा, याचा गमतीदार किस्सा अप्टन यांनी सांगितला आहे. अप्टन यांनी धोनीच्या एका शिक्षेचाही उल्लेख केला आहे. ''मी भारतीय संघाचा सदस्य झालो त्यावेळी अनिल कुंबळे हा कसोटी संघाचा, तर धोनी वन डे संघाचा कर्णधार होता. त्यावेळी सराव सत्रात आम्ही सर्व खेळाडूंना वेळेवर येण्याची शिस्त लावली होती. त्यात कोणी अपयशी ठरल्यास त्याला शिक्षाही देण्यात येत होती. कुंबळेने उशीरा येणाऱ्या खेळाडूला 10000 हजाराचा दंड भरण्याच्या शिक्षेचा पर्याय सूचवला होता. त्याने याबाबत धोनीलाही विचारले. धोनीनं त्यात ट्विस्ट आणला. त्याने उशीरा येणाऱ्या खेळाडूंसह सर्वच खेळाडूंकडून 10000 दंड वसूल करण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर सराव सत्रात कोणीही उशीरा आलेले नाही,'' असे अप्टन यांनी लिहिले आहे.