Assembly Election Result 2023 : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा २०२४ ची सेमी फायनल. आतापर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये सत्ताबदल होण्याची चिन्हं असून काँग्रेसची सत्ता जाण्याची दाट शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाची दमदार कामगिरी पाहता त्यांचे कौतुक होत आहे. सत्ताधारी भाजपाचे नेते, कार्यकर्ते आतापासूनच विजय साजरा करू लागले आहेत. पण, तेलंगणात काँग्रेस आघाडीवर असून सत्ताधारी केसीआर यांचा पक्ष पिछाडीवर आहे.
काँग्रेसच्या पराभवानंतर अनेकांनी पक्षावर टीकास्त्र सोडले. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने देखील काँग्रेसची फिरकी घेतल्याचे दिसते. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत 'पनौती कोण?' असा प्रश्न केला.
दरम्यान, वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी विविक्ष क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार झाले होते. यावरून खासदार राहुल गांधी यांनी भारताच्या पराभवास मोदी यांना जबाबदार धरले होते.
राहुल गांधींनी काय म्हटले होते?
राहुल गांधी यांनी राजस्थान येथे एका संभेला संबोधित करताना मोदींविरोधात पनौती शब्दाचा वापर केला होता. ज्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. खरं तर यावेळी राहुल यांनी मोदींचे नाव घेतले नव्हते. त्यांनी म्हटले होते की, टीम इंडिया चांगली खेळत होती, पण 'पनौती'ने भारताला हरवले.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. पंरतु, २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपाने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.
Web Title: Assembly Election Result 2023 After the defeat of Congress in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, former Pakistan player Danish Kaneria has questioned who now Panauti
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.