Join us  

PAK vs ENG : उद्या सामना अन् बेन स्टोक्ससह इंग्लंडचे १२ खेळाडू पडले आजारी; पाकिस्तान दौरा पुन्हा चर्चेत 

PAK vs ENG : पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होणार आणि कसोटीच्या आदल्या दिवशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:34 PM

Open in App

PAK vs ENG : पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होणार आणि कसोटीच्या आदल्या दिवशी बेन स्टोक्ससह ( Ben Stokes) इंग्लंडचे १२ खेळाडू Virus मुळे आजारी पडले. हा कोरोनाचा व्हायरस नसल्याचे अनेकांनी स्पष्ट केले, तर काहींनी फुड पॉयझनिंग असल्याचे सांगितले आहे. मागील दौऱ्यावर इंग्लंडच्या खेळाडूंना पाकिस्तानमधील जेवण जेऊन बाधा झाली होती आणि त्यामुळे यंदा त्यांनी स्वतःचा आचारी सोबत नेला आहे. तरीही इंग्लंडचे खेळाडू आजारी पडलेत. त्यामुळे उद्याच्या कसोटीवर प्रश्नचिन्ह आहे.  पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचा भाग आहेत. पहिला सामना रावळपिंडी येथे १ ते ५ डिसेंबर, दुसरा सामना मुल्तान येथे ९ ते १३ डिसेंबर आणि शेवटचा सामना कराची येथे १७ ते २१ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे WTC मधील आव्हान संपुष्टात आले आहे. 

इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :इंग्लंडपाकिस्तानबेन स्टोक्स
Open in App