Join us

IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक ठरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 10:27 IST

Open in App

Australia A vs India A, 1st unofficial Test, Sai Sudharsan Century In Australia : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल होण्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघ अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी सामन्यात आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी ८.५ कोटींचा 'बोनस' मिळालेल्या भारतीय संघातील पठ्ठ्यानं शतकी धमाक्यासह ऑस्ट्रेलियात दिवाळी साजरी केली आहे. 

ऑस्ट्रेलियन मैदानात साई सुदर्शनच्या भात्यातून आली सेंच्युरी

ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावानंतर भारतीय 'अ' संघ ८८ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियन मैदानात संघ अडचणीत असताना साई सुदर्शन याच्या भात्यातून शतकी खेळी आल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यात दमदार कमबॅक केले आहे. २०० चेंडूत  ९ चौकारासह ५०.५१ च्या सरासरीनं ठोकल्या १०३ धावा

सात नंबरची जर्सी घालून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साई सुदर्शननं २०० चेंडूत १०३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ खणखणीत चौकारांचा समावेश होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याच्या भात्यातून तिसऱ्यांदा तीन आकडी धावसंख्या पाहायला मिळाली.  

गुजरात टायटन्सच्या संघानं ८.५ कोटी खर्च करून साई सुदर्नला केलं होतं रिटेन साई सुदर्शन हा आयपीएलच्या मेगा लिलावाआधी मोठ्या रक्कमेसह रिटेन झालेल्या खेळाडूंपैकी एक आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने तब्बल ८.५ कोटी खर्च करून या खेळाडू आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 'अ' संघाकडून खेळताना पहिल्या डावातील तो २१ धावांवर बाद झाला होता. हे अपयश त्याने शतकी खेळीसह भरून काढले. 

साई सुदर्शन अन्  देवदत्त पडिक्कलनं तिसऱ्या विकेटसाठी केली १९६ धावांची भागीदारी 

ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या सामन्यात डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शन याने  देवदत्त पडिक्कलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. ही जोडी टॉड मर्फीनं फोडली. त्याने आधी साई सुदर्शन आणि त्यानंतर देवदत्त पडिक्कला आउट केले. पडिक्कलनं १९९ चेंडूंचा सामना करताना ८८ धावांची खेळी केली. त्याचे शतक १२ धावांनी हुकलं. या जोडीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय 'अ' संघानं दुसऱ्या डावात ३३२ धावा करतऑस्ट्रेलिया 'अ' संघासमोर २२५ धावांच टार्गेट सेट केलं आहे.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघगुजरात टायटन्सआयपीएल २०२४भारतआॅस्ट्रेलिया