AUS vs BAN : कमिन्सची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने कडवी झुंज दिली; सन्मानजनक धावसंख्या उभारली

AUS vs BAN T20 World Cup 2024 : आज बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 07:26 AM2024-06-21T07:26:10+5:302024-06-21T07:44:23+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Bangladesh set Australia a target of 141 runs to win, Adam Zampa and pat cummins performs well | AUS vs BAN : कमिन्सची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने कडवी झुंज दिली; सन्मानजनक धावसंख्या उभारली

AUS vs BAN : कमिन्सची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने कडवी झुंज दिली; सन्मानजनक धावसंख्या उभारली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ४४व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे संघ भिडले. ऑस्ट्रेलियन संघाने विजयाचा चौकार लगावून सुपर-८ चे मध्ये प्रवेश केला. तर बांगलादेशला संघर्ष करावा लागला. सुपर-८ मधील ही लढत एंटीगुआ येथील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवली जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, कर्णधार नजमुल हुसैन शांतोने कडवी झुंज देताना सर्वाधिक (४१) धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. 
मात्र, त्याला देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात डम झाम्पाने यश मिळवले. 

बांगलादेशचा कर्णधार बाद झाल्यानंतर तौहीद हृदयोयने मोर्चा सांभाळला. त्याने अखेरच्या काही षटकांमध्ये स्फोटक खेळी केली. २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४० धावा करण्यात तौहीदला यश आले. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाला सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी १४१ धावांचे लक्ष्य दिले. मागच्या सामन्यात बाकावर बसलेला पॅट कमिन्स आज संघाचा भाग आहे. त्याने या सामन्याच्या अखेरच्या षटकांत अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर डम झाम्पा (२), मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विशेष बाब म्हणजे या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची किमया पॅट कमिन्सने साधली. 

ऑस्ट्रेलियाचा संघ -
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, डम झाम्पा, जोश हेझलवुड. 

बांगलादेशचा संघ - 
नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), अंजिद हसन, लिटन दास, शाकिब अल हसन, तौहीद हृदयोय, महमुदुल्लाह, महेदी हसन, रिशन हुसैन, तस्कीन अहमद, तन्जीम हसन साकिब, मुस्ताफिजुर रहमान. 

Web Title: AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Bangladesh set Australia a target of 141 runs to win, Adam Zampa and pat cummins performs well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.