AUS vs AFG : Pat Cummins ची हॅटट्रिक! सामन्यानंतर स्टार खेळाडूचे अजब विधान, म्हणाला...

pat cummins hat trick video : बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सने हॅटट्रिक घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:47 AM2024-06-21T11:47:02+5:302024-06-21T11:51:05+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Pat Cummins said, I had no idea on the hat-trick | AUS vs AFG : Pat Cummins ची हॅटट्रिक! सामन्यानंतर स्टार खेळाडूचे अजब विधान, म्हणाला...

AUS vs AFG : Pat Cummins ची हॅटट्रिक! सामन्यानंतर स्टार खेळाडूचे अजब विधान, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates : सुपर-८ मध्ये विजयी सलामी देण्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला यश आले. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत आणि पावसाने केलेल्या मदतीमुळे कांगारूंचा विजय सोपा झाला. पॅट कमिन्सने हॅटट्रिक घेत ऐतिहासिक कामगिरी केली. २००७ मध्ये ब्रेट लीने ट्वेंटी-२० विश्वचषकात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. त्यानंतर विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. मात्र, सामन्यानंतर त्याच्या हॅटट्रिकबद्दल बोलताना कमिन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिली. हॅटट्रिकबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे त्याने सांगितले.

बांगलादेशने दिलेल्या १४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे दोनवेळा सामना थांबवावा लागला. ६.२ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबला. पावसानंतर पुन्हा सामना सुरू होताच ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. रिशाद हुसेनने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. २१ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्याने ३१ धावा केल्या. सात षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद ६५ धावा अशी होती. कांगारूंना नवव्या षटकात कर्णधार मिचेल मार्शच्या रूपात दुसरा झटका बसला. ११.२ षटकापर्यंत खेळ पोहोचला असता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद १०० होती त्यामुळे कांगारूंचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार २८ धावांनी पुढे होता. पाऊस कायम राहिल्याने अखेर डकवर्थ लुईस या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक (५३ नाबाद) खेळी केली. 

सामन्यानंतर पॅट कमिन्सने सांगितले की, मी हॅटट्रिक घेतली आहे याची मला थोडीही कल्पना नव्हती. मी जेव्हा मोठ्या स्क्रीनवर पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले. कमिन्सने १८ व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर महमुदुल्लाह आणि महेदी हसन यांना बाद केले. त्यानंतर विसावे षटक घेऊन आलेल्या कमिन्सने पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदयोयला बाहेरचा रस्ता दाखवला आणि आपली हॅटट्रिक पूर्ण केली. 

तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने साजेशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागत नव्हता. पण, कर्णधार नजमुल हुसैन शांतोने कडवी झुंज देताना सर्वाधिक (४१) धावांची खेळी केली. त्याने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या. अखेर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या अन् ऑस्ट्रेलियाला सुपर-८ मध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी १४१ धावांचे लक्ष्य दिले. मागच्या सामन्यात बाकावर बसलेल्या कमिन्सने या सामन्यात हॅटट्रिक घेतली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ॲडम झाम्पा (२), मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

Web Title: AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Pat Cummins said, I had no idea on the hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.