AUS vs ENG 1st T20: मॅथ्यू वेडचे लाजीरवाणे कृत्य; झेल घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला दिला धक्का, पाहा Video...

AUS vs ENG 1st T20: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात हा प्रकार घडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 08:57 PM2022-10-09T20:57:46+5:302022-10-09T20:57:57+5:30

whatsapp join usJoin us
AUS vs ENG 1st T20: Shameful work by Matthew Wade; stopped English bowler to catch, watch the video... | AUS vs ENG 1st T20: मॅथ्यू वेडचे लाजीरवाणे कृत्य; झेल घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला दिला धक्का, पाहा Video...

AUS vs ENG 1st T20: मॅथ्यू वेडचे लाजीरवाणे कृत्य; झेल घेणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाला दिला धक्का, पाहा Video...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

AUS vs ENG 1st T20:इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरोधात टी-20 मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. पर्थ येथे रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही देशांमधला दुसरा टी-20 सामना 12 ऑक्टोबरला कॅनबेरा येथे खेळवला जाणार आहे.

मॅथ्यू वेडचे लाजीरवाणे कृत्य

पहिल्या T-20 सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेडने इंग्लिश गोलंदाज मार्क वूडला धक्का दिल्याने वादही निर्माण झाला होता. धक्का दिल्याची घटना ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर घडली. मॅथ्यू वेडने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेत गेला. यावेळी गोलंदाज मार्क वुडला हा झेल टिपण्याची संधी होती. 


पण, मार्क वुड चेंडूच्या जवळ येताना पाहून मॅथ्यू वेडने क्रीजच्या आत जाण्याच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य केले. यादरम्यान वेडने झेल टाळण्यासाठी मार्क वुडला हाताने ढकलले, त्यामुळे वुडला झेल पकडता आला नाही. इंग्लिश संघाने वेडविरुद्ध अडथळा आणल्याबद्दल अपील केले नाही, त्यामुळे मैदानावरील पंचांनीही प्रकरण तिसऱ्या पंचांकडे पाठवले नाही. हा वाद जिथल्या तिथेच मिटला.

हेल्स ठरला सामनावीर 
अॅलेक्स हेल्सने 51 चेंडूत 84 धावांची शानदार खेळी खेळली, ज्याच्या जोरावर इंग्लिश संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला 20 षटकात 9 विकेट्सवर फक्त 200 धावा करता आल्या. इंग्लंड संघासाठी मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 34 धावांत 3 बळी घेतले. रीस टोपले आणि सॅम करन यांना 2-2 असे विकेट मिळाल्या. 
 

Web Title: AUS vs ENG 1st T20: Shameful work by Matthew Wade; stopped English bowler to catch, watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.