Join us  

ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना

Steve Smith wicket video : स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 6:04 PM

Open in App

ENG vs AUS 2nd Test : सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. सलामीचा सामना जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली. आज दुसरा सामना खेळवला जात असून, ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा स्वस्तात तंबूत परतला. इंग्लंडमधील हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंडवर ही लढत होत आहे. मॅथ्यू पोट्सने अप्रतिम चेंडू टाकून स्मिथचा त्रिफळा काढला. वाऱ्याच्या वेगाने आलेला चेंडू इनस्विंग होऊन स्टम्पात शिरला अन् स्मिथला बाहेरचा रस्ता धरावा लागला. 

यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅट शॉर्ट (२९) आणि ट्रॅव्हिस हेड (२९) यांनी संयमी खेळी केली. त्यानंतर मिचेल मार्शने ६० धावा करुन आपल्या चाहत्यांना जागे केले. पण, मार्श बाद होताच ऑस्ट्रेलियाची गाडी रुळावरुन घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्टीव्ह स्मिथ ६ चेंडूत ४ धावा करुन बाद झाला. 

दरम्यान, पहिला वन डे सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४९.४ षटकांत ३१५ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन डकेट (९५), विल जॅक्स (६२) आणि हॅरी ब्रूकने (३९) धावा केल्या. इंग्लंडने दिलेल्या ३१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली. त्याने नाबाद १५४ धावा करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय मार्नस लाबुशेन (७७) आणि स्टीव्ह स्मिथने (३३) धावा केल्या. 

टॅग्स :इंग्लंडआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ