ENG vs AUS 3rd ODI : सलग दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा करण्याच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक एकटा भिडला. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने आपला विजयरथ कायम ठेवला. पण, मंगळवारी झालेला तिसरा सामना जिंकून इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले. तिसऱ्या वन डेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने डकवर्थ लुईस नियमामुळे ऑस्ट्रेलियाचा ४६ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा सलग १४ वन डे सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला. इंग्लंडमधील रिव्हरसाईड मैदानात तिसरा वन डे सामना खेळवला गेला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ७ गडी गमावून ३०४ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडने ३७.४ षटकांत ४ बाद २५४ धावा केल्या. यानंतर पुढे खेळ होऊ शकला नाही. अशा प्रकारे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी ब्रूकने नाबाद शतक झळकावले. हॅरी ब्रूक ९४ चेंडूत ११० धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकार मारले. तर विल जॅकने ८२ चेंडूत ८४ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडचा कसाबसा विजय
तत्पुर्वी, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ७ गडी गमावून ३०४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने ६५ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. याशिवाय स्टीव्ह स्मिथने ८२ चेंडूत ६० धावांचे योगदान दिले. तर ॲरॉन हार्डीने २६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. तसेच ग्लेन मॅक्सवेल २५ चेंडूत ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. पण, विल जॅक्स आणि हॅरी ब्रूक यांच्या खेळीने इंग्लंडचा पराभव टळला आणि पहिला विजय मिळवण्यात त्यांना यश आले.
Web Title: AUS Vs ENG 3rd ODI England won the third match on the strength of harry brook's century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.