मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. आज मालिकेतील अखेरचा अर्थात तिसरा सामना खेळवला गेला. कांगारूच्या संघाने पहिले दोन सामने जिंकून 2-0ने विजयी आघाडी घेतली होती. आजचा सामना देखील जिंकून कांगारूच्या संघाने विश्वविजेत्यांना आपल्या धरतीवर लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात वॉर्नरने 103.92 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत शतक झळकावले. वॉर्नरशिवाय ट्रॅव्हिस हेडने देखील शतकी खेळी केली. मात्र मिचेल मार्शने मारलेल्या षटकारामुळे हा सामना फारच चर्चेत राहिला.
डेव्हिड वॉर्नरने मोठ्या कालावाधीनंतर शतक झळकावले. खंर तर त्याने तब्बल 1,043 दिवसांनंतर शतकी खेळी केली. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 19 शतके झळकावली आहेत. व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 20 शतकांची नोंद आहे. या सामन्यात त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत पहिल्या बळीसाठी एकूण 269 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने तब्बल 115 मीटर षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधले. ़
ऑस्ट्रेलियाने 3-0 ने मालिका जिंकली
पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्हीही डावातील 2-2 षटके कमी करण्यात आली आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड (152) आणि डेव्हिड वॉर्नर (106) या दोघांनी एकूण 269 धावा केल्या. कांगारूच्या संघाने निर्धारित 48 षटकांमध्ये एकूण 355 धावा केल्या होत्या. इंग्लिश संघाला आपले अस्तित्व राखण्यासाठी 48 षटकांत 356 धावांची आवश्यकता होती. मात्र इंग्लंडचा संघ 31.4 षटकांतच 142 धावांवर सर्वबाद झाला आणि कांगारूने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिन्ही सामने जिंकून विश्वविजेत्या इंग्लंडचा दारूण पराभव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: aus vs eng Australia's Mitchell Marsh hits a 115m long six, watch video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.