ICC ODI World Cup AUS vs ENG Live : ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी गतविजेत्या इंग्लंडवर विजय मिळवून उपांत्य फेरीच्या दिशेने मोठी झेप घेतली. इंग्लंडचा हा ७ सामन्यांतील सहावा पराभव ठरला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. वर्ल्ड कपमधील अव्वल ७ संघ २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफीत खेळणार आहेत आणि इंग्लंडने तीन संधी गमावली. हा त्यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरला. ऑस्ट्रेलियाने १० गुणांसह तिसरे स्थान मजबूत केले आहे आणि त्यांना अफगाणिस्तान ( ७ नोव्हेंबर) व बांगलादेश ( ११ नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे.
इंग्लंडच्या ख्रिस वोक्स ( ४-५४), मार्क वूड ( २-७०) आणि आदील राशीद ( २-३८) यांच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत २८६ धावांवर माघारी पाठवले. ट्रॅव्हीस हेड ( ११) व डेव्हिड वॉर्नर ( १५) यांच्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ ( ४४) व मार्नस लाबुशेन ( ७१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. मधल्या षटकांत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले होते, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना पुन्हा बॅकफूटवर फेकले. कॅमेरून ग्रीन ( ४७) व मार्कस स्टॉयनिस ( ३५) यांनी चांगली फटकेबाजी केली. शेवटच्या षटकात अॅडम झम्पाने २९ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले.
कर्णधार जॉस बटलर ( १) अपयशी ठरला अन् अॅडम झम्पाने त्याला बाद केला. धावा व चेंडू यांच्यातले अंतर सातत्याने वाढत चालले होते. स्टोक्स व मोईन अली यांनी ६३ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकण्याचा केलेला प्रयत्न फसला. झम्पाने ३६व्या षटकात स्टोक्सला ( ६४) बाद केले. पॅट कमिन्सने इंग्लंडच्या लिएम लिव्हिंगस्टोनला बाद करून मॅच एकाबाजूने झुकवली. त्यात झम्पाने आणखी एक सेट फलंदाज मोईन अली ( ४२) याची विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित केला. झम्पाने १०-०-२१-३ असा प्रभावी स्पेल टाकला. डेव्हिड विली ( १५) याला हेझलवूडने बाद केले.
आदील राशीद आणि ख्रिस वोक्स ( ३२) यांच्या ३७ धावांच्या भागीदारीने इंग्लंडसाठी संघर्ष केला, पण मार्कस स्टॉयनिसने नववा झटका दिला. हेझलवूडने शेवटची विकेय घेऊन इंग्लंडचा संपूर्ण संघ २५३ धावांत पाठवला अन् ३३ धावांनी विजय मिळवला.