बॉर्डर गावसकर स्पर्धेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानात खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात दोन बदल; ऑस्ट्रेलियन संघात जोश
भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह मैदानात उतरला आहे. अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. याशिवाय हर्षित राणाच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आलीये. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघात एक बदल दिसून येतो. त्यांनी स्कॉट बोलँडऐवजी जोश हेजलवूडला संधी दिलीये. भारतीय संघाची प्लेइंग (India Playing XI)) यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा (क), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन (Australia (Playing XI):उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेट किपर), पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.